मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांमध्ये प्रशासनाला मोठे यश मिळाले आहे. इंफाळ खोऱ्यात वेगवेगळ्या कारवाईत विविध बंदी घातलेल्या संघटनांशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी शुक्रवारी (१४ मार्च) दिली. या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
मणिपूर पोलिसांनी सांगितले की, पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (पीएलए) एका सदस्याला गुरुवारी इम्फाळ पश्चिम जिल्ह्यातील सागोलबंद सयंग कुराओ माखोंग येथील त्याच्या घरातून अटक करण्यात आली. अटक केलेल्या दहशतवाद्याचे नाव थोक्चोम ओंगबी अनिता देवी (४६) असे आहे. पोलिसांनी त्याच्याकडून एक पिस्तूल, एक मॅगझिन, ३३ काडतुसे, पाच सिम कार्ड आणि सहा मोबाईल फोन जप्त केले आहेत.
हे ही वाचा :
‘सनातन धर्माव्यतिरिक्त कुठेही समृद्ध सण, उत्सवांची परंपरा नाही!’
राऊतांनी रोज सकाळी ९ वाजताचा शिमगा बंद करुन महाराष्ट्राच्या हितासाठी सूचना कराव्यात
माजी आमदार आसीफ शेख म्हणतात, मालेगाव निवडणुकीसाठी बाहेरून पैसा आला होता!
१९ मार्चपूर्वी सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परत येण्याची शक्यता नाहीच
पोलिसांनी भारत-म्यानमार सीमेजवळून बंदी घातलेल्या युनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रंटच्या (UNLF-K) एका सदस्यालाही अटक केली. त्याची ओळख मोइरंगथेम रिकी सिंग (२२) अशी झाली, जो इंफाळ पूर्व जिल्ह्यातील खुराई चैरेनथोंगचा रहिवासी आहे. त्याला तेनुगोपाल जिल्ह्यात अटक करण्यात आली.
याशिवाय, काकचिंग जिल्ह्यातील सेकमैजिन निंगोलखोंग येथून बंदी घातलेल्या पीआरईपीएके (PREPAK) च्या एका सक्रिय सदस्याला अटक करण्यात आली. बिशोरजीत मेईतेई असे त्याचे नाव आहे. यासह मणिपूर पोलिसांनी सांगितले की, आणखी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या व्यक्तीवर लाकूड वाहतूक करणाऱ्या वाहनांकडून जबरदस्तीने पैसे वसूल केल्याचा आरोप आहे.