जपानमध्ये एका रुग्णाला घेवून जाणारे वैद्यकीय हेलिकॉप्टर अचानक समुद्रात कोसळले. या रुग्णवाहिका हेलिकॉप्टरमध्ये एकूण सहा जण होते. दुर्घटनेनंतर ६ पैकी ३ जण बेपत्ता झाले आहेत. तटरक्षक दलांकडून त्यांचा शोध सुरू आहे. जपानच्या नैऋत्य भागात हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत जपान कोस्ट गार्डने ही माहिती दिली.
कोस्ट गार्डने सांगितले की, रुग्णाव्यतिरिक्त, हेलिकॉप्टरमध्ये एक डॉक्टर, एक परिचारिका, एक पायलट, एक हेलिकॉप्टर मेकॅनिक आणि एक रुग्णाची काळजी घेणारा होता. अपघातानंतर जपानी तटरक्षक दलाने तातडीने मदत केली आणि ३ जणांना वाचवले. तिघांच्या शरीरामध्ये पाणी भरले होते. पण त्यांना ताबडतोब वैद्यकीय उपचारांसाठी नेण्यात आले.
जपान कोस्ट गार्डच्या एका अधिकाऱ्याने, बचावलेल्या लोकांची ओळख पटलेली नाही. ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. बचाव कार्याचा भाग म्हणून तटरक्षक दलाने या भागात दोन विमाने आणि तीन जहाजे तैनात केली आहेत.
हे ही वाचा :
प्लिज…प्लिज… कामराची मुंबई पोलिसांना विनंती!
भारताने म्यानमारला मदत वाढवली, ३१ टन साहित्य घेवून विमान रवाना!
काही जणांना विनाकारण छाती बडवण्याची सवय!
रामभक्तांवर फुले उधळत इक्बाल अन्सारी काय म्हणाले?
तटरक्षक दलाच्या म्हणण्यानुसार, हे हेलिकॉप्टर नागासाकी येथील विमानतळावरून फुकुओका येथील रुग्णालयात जात होते. याच दरम्यान हा अपघात झाला. या दुर्घटनेत बेपत्ता असणाऱ्या तिघांचा शोध सुरु असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
JUST IN!! 新着記事
⠀ //
🗣福岡和白病院の医療搬送用ヘリコプターが消息不明
\
もっと見る 👇👇
📰https://t.co/GBDUwecErL6日13時10分ごろ、福岡和白病院の医療搬送用ヘリコプター「ホワイトバード」と連絡が取れなくなりました。 pic.twitter.com/jrENciYrhX
— RKB毎日放送NEWS📺 (@rkbnews4ch) April 6, 2025