दिल्ली विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. सार्वजनिक निधीच्या गैरवापराप्रकरणी अरविंद केजरीवालांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले असून यामुळे त्यांचा पाय आणखी खोलात गेला आहे. दिल्लीतील राऊस अव्हेन्यू न्यायालयाने यासंदर्भात पोलिसांना निर्देश दिले आहेत.
अरविंद केजरीवाल यांना दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टाकडून दणका मिळाला आहे. मोठमोठे होर्डिंग्ज लावण्यासाठी सार्वजनिक पैशाचा गैरवापर केल्याबद्दल न्यायालयाने दिल्ली पोलिसांना त्यांच्या आणि आप पक्षाच्या इतर नेत्यांविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाची सुनावणी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी नेहा मित्तल यांनी केली. शिवकुमार सक्सेना यांनी यासंदर्भात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने याचिका स्वीकारली असून दिल्ली पोलिसांना १८ मार्च रोजी या प्रकरणी अहवाल दाखल करण्याचे निर्देशही दिले आहेत.
हे ही वाचा :
पाकिस्तानची नाचक्की; सरकारी अधिकाऱ्यालाही अमेरिकेने नाकारला प्रवेश
बांगलादेशात सोन्याचे दुकान लुटून हिंदू सोनाराची हत्या!
डोंबिवलीत आरएसएसच्या शाखेवर दगडांचा मारा, रिझवान शेखसह ५ जण ताब्यात
ईशान्येकडील आणि उर्वरित भारतामधील अंतर कमी केले हेच सरकारचे मोठे यश
२०१९ मध्ये द्वारका येथे मोठे होर्डिंग्ज लावून सार्वजनिक निधीचा गैरवापर केल्याबद्दल माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि इतरांविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर राऊस अव्हेन्यू न्यायालयाने निर्णय देताना एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. अरविंद केजरीवाल, माजी आप आमदार गुलाब सिंह आणि द्वारका नगरसेवक नीतिका शर्मा यांनी परिसरातील विविध ठिकाणी मोठे होर्डिंग्ज लावून सार्वजनिक पैशाचा जाणूनबुजून गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला होता. यानंतर, मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटने सप्टेंबर २०२२ मध्ये तक्रार फेटाळून लावण्याचा आदेश दिला. यानंतर सत्र न्यायाधीशांनी खटला पुन्हा मॅजिस्ट्रेट कोर्टात पाठवला. या प्रकरणात, विशेष न्यायाधीशांनी मॅजिस्ट्रेट कोर्टाला या प्रकरणाची पुन्हा सुनावणी करण्यास सांगितले होते.