संजय राऊतांना ईडीकडून समन्स

संजय राऊतांना ईडीकडून समन्स

राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालेलं असताना शिवसेनेच्या अडचणी वाढल्या आहेत. शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांना ईडीने समन्स बजावलं आहे. पत्राचाळ जमीन घोटाळाप्रकरणी ईडीनं हे समन्स बजावल्याची माहिती मिळत आहे. उद्या, २८ जून रोजी ईडीसमोर चौकशीला हजर राहण्याचे संजय राऊतांना आदेश देण्यात आले आहेत.

ईडीकडून संजय राऊत यांना आज, १७ जून रोजी समन्स पाठवण्यात आलं असून डीएचएफएल केसमध्येही त्यांना आरोपी बनवण्यात आलं आहे. ईडीने सीबीआयच्या गुन्ह्याचा आधार घेत डीएचएफएल बँक घोटाळ्यात नवीन मनी लाँड्रिंग गुन्हा दाखल केला आहे. यात संजय राऊत हे आरोपी आहेत. संजय राऊत यांना आज गोरेगाव पत्राचाळ प्रकरणात समन्स देण्यात आले असून डीएचएफएल प्रकरणातही त्यांची चौकशी होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे सध्या ईडीकडे संजय राऊत यांच्याविरोधातील दोन प्रकरणाचा तपास आहे.

काही दिवसांपूर्वी ईडीकडून संजय राऊत यांची संपत्ती जप्त करण्यात आली होती. याप्रकरणी प्रवीण राऊत यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. तसेच ईडीनं यापूर्वी प्रवीण राऊत यांच्यावर आरोपपत्र दाखल केलं होतं. प्रवीण राऊत, सारंग वाधवान, एचडीआयएलचे राकेश वाधवान, गुरु आशिष कन्स्ट्रक्शन आणि इतरांची आरोपपत्रात नावं आहेत.

हे ही वाचा:

बंडखोर ३८ आमदारांनी ठाकरे सरकारचा पाठिंबा काढल्याचा याचिकेत दावा

मुडदे येतील… यावरून संजय राऊत लक्ष्य

अयोध्येच्या निर्मली कुंड चौक परिसरात आढळले हातबॉम्ब

“आदित्य ठाकरे राऊतांसारखं बोलायला लागले तर भविष्य वाईट”

गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्रात गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (म्हाडा) भूखंड आहे. ईडीच्या आरोपानुसार, प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचं काम देण्यात आलं होतं. मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला, असा आरोप आहे. प्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळमध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे.

Exit mobile version