28 C
Mumbai
Saturday, March 29, 2025
घरदेश दुनियायुद्धग्रस्त गाझामधील परिस्थितीबद्दल भारताने व्यक्त केली चिंता

युद्धग्रस्त गाझामधील परिस्थितीबद्दल भारताने व्यक्त केली चिंता

गाझामधील लोकांसाठी मानवतावादी मदतीचा पुरवठा सुरू ठेवण्याचे केले आवाहन

Google News Follow

Related

इस्रायलने गाझा पट्टीवर मंगळवारी हवाई हल्ले केले यात ४०० हून अधिक लोक ठार झाल्याचा दावा करण्यात येत आहे. या हल्ल्यानंतर युद्धविरामालाही तडा गेला. दरम्यान, युद्धग्रस्त गाझा येथील परिस्थितीबद्दल भारताने बुधवारी चिंता व्यक्त केली. तसेच भारताने गाझामधील मानवतावादी मदतीचा पुरवठा सुरू ठेवण्याचे आवाहन केले.

परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी गाझामधील अलिकडच्या हल्ल्यांबद्दल आणि तेथील विकसित होत असलेल्या परिस्थितीबद्दल एक निवेदन जारी केले. या परिस्थतीबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. तसेच ओलिसांच्या सुटकेच्या महत्त्वावर भर दिला. गाझामधील लोकांसाठी मानवतावादी मदतीचा पुरवठा सुरू ठेवण्याचे आवाहन केले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले की, “आम्हाला गाझातील परिस्थितीबद्दल चिंता आहे. सर्व ओलिसांची सुटका करणे अत्यंत आवश्यक आहे. आम्ही गाझाच्या लोकांना मानवतावादी मदतीचा सतत पुरवठा करण्याचे आवाहन करतो.”

मंगळवारी पहाटे, इस्रायल संरक्षण दलाने (आयडीएफ) गाझा पट्टीमध्ये हमासच्या दहशतवादी लक्ष्यांवर व्यापक हल्ले केले. आयडीएफने म्हटले आहे की, “राजकीय पातळीवर, आयडीएफ आणि आयएसए सध्या गाझा पट्टीमध्ये हमास दहशतवादी संघटनेच्या दहशतवादी लक्ष्यांवर व्यापक हल्ले करत आहे.” इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने स्पष्ट केले की, पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांच्या सूचनांनुसार हल्ले करण्यात आले, कारण हमासने ओलिसांना सोडण्यास वारंवार नकार दिला होता. इस्रायल आतापासून, वाढत्या लष्करी ताकदीने हमासविरुद्ध कारवाई करेल, असा इशाराही इस्रायली पंतप्रधान कार्यालयाने दिला आहे.

हे ही वाचा : 

कानपूरमध्ये पाकिस्तानी एजंट, आयएसआयला देत होता गुप्त माहिती, एटीएसने केली अटक!

भारत १८ वर्षांनंतर एएफसी बीच सॉकर एशिया कपमध्ये ऐतिहासिक पुनरागमन करण्यास सज्ज

गोळी न चालवता ‘कलम ३७०’ हटवून जम्मू-कश्मीरचे देशात पूर्ण विलीनीकरण

कर्नाटका: महिलांना मोफत गोष्ट देता तर दारू पिणाऱ्याला दोन बाटल्या मोफत द्याव्या!

दरम्यान, या हल्ल्यात ४०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत आहे. इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये गाझामधील त्यांच्या सरकारचे प्रमुख इस्साम अल-दलिस यांच्यासह अनेक उच्च अधिकाऱ्यांच्या मृत्यूची पुष्टी हमासने केली. गृह मंत्रालयाचे प्रमुख महमूद अबू वत्फा आणि अंतर्गत सुरक्षा सेवेचे महासंचालक बहजत अबू सुलतान यांचाही मृत्यू झाला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
239,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा