28.5 C
Mumbai
Saturday, April 12, 2025
घरदेश दुनियाHAL ने रशियन शस्त्रास्त्र एजन्सीला संवेदनशील तंत्रज्ञान पुरवल्याचा आरोप भारताने फेटाळला

HAL ने रशियन शस्त्रास्त्र एजन्सीला संवेदनशील तंत्रज्ञान पुरवल्याचा आरोप भारताने फेटाळला

न्यू यॉर्क टाईम्सच्या अहवालातून करण्यात आलेला आरोप

Google News Follow

Related

भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील एरोस्पेस आणि संरक्षण कंपनी असलेल्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने (HAL) रशियन शस्त्रास्त्र एजन्सीला संवेदनशील तंत्रज्ञान पुरवल्याचा आरोप करणारा न्यू यॉर्क टाईम्सचा अहवाल भारताने फेटाळून लावला आहे. यासंबंधीचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले. परराष्ट्र मंत्रालयाने असे म्हटले आहे की न्यू यॉर्क टाईम्सच्या अहवालात उल्लेख केलेल्या भारतीय संस्थेने धोरणात्मक व्यापार नियंत्रणे आणि अंतिम वापरकर्ता वचनबद्धतेवरील सर्व आंतरराष्ट्रीय दायित्वांचे पालन केले आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, “हा अहवाल तथ्यात्मकदृष्ट्या चुकीचा आणि दिशाभूल करणारा आहे. राजकीय कथेला अनुकूल करण्यासाठी त्यात मुद्दे मांडण्याचा आणि तथ्ये विकृत करण्याचा प्रयत्न केला गेला आहे.” तसेच सरकारने माध्यमांना असे अहवाल प्रकाशित करताना योग्य काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. भारताच्या धोरणात्मक व्यापारावरील मजबूत कायदेशीर आणि नियामक चौकटीमुळे त्यांच्या कंपन्यांना परदेशातील व्यावसायिक उपक्रमांना मार्गदर्शन मिळत आहे. आम्हाला अशी अपेक्षा आहे की प्रतिष्ठित माध्यमांनी असे अहवाल प्रकाशित करताना मूलभूत योग्य काळजी घ्यावी, जे या प्रकरणात स्पष्टपणे दुर्लक्षित केले गेले होते, अशी भूमिका भारताने स्पष्ट केली आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने यासदंर्भात त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नाही.

न्यू यॉर्क टाईम्सने २८ मार्च रोजी प्रकाशित केलेल्या एका लेखानंतर या वादाला सुरुवात झाली. अहवालात म्हटले आहे की ब्रिटिश एरोस्पेस उत्पादक एचआर स्मिथ ग्रुपने एचएएल मार्फत जवळजवळ दोन दशलक्ष डॉलर ट्रान्समीटर, कॉकपिट उपकरणे आणि इतर संवेदनशील तंत्रज्ञान पाठवले होते, जे युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाला विकता येणार नाहीत असे ब्रिटिश आणि अमेरिकन लोकांनी म्हटले आहे.

अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, काही प्रकरणांमध्ये भारतीय कंपनीने म्हणजेच HAL ने HR स्मिथकडून उपकरणे घेतली आणि काही दिवसांतच, त्याच ओळखीच्या उत्पादन कोडसह भाग रशियाला पाठवले. HR स्मिथने २०२३ आणि २०२४ मध्ये HAL ला प्रतिबंधित तंत्रज्ञानाच्या ११८ शिपमेंट केल्या. त्यांची किंमत २ दशलक्ष डॉलर्स होती. त्या काळात, एचएएलने त्याच भागांच्या १३ शिपमेंट रोसोबोरोनेक्सपोर्टला केल्याचे वृत्त आहे, ही एक रशियन शस्त्रास्त्र संस्था आहे जी युनायटेड स्टेट्स आणि युनायटेड किंग्डमने काळ्या यादीत टाकली आहे. या शिपमेंटची किंमत १४ दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त होती. रोसोबोरोनेक्सपोर्ट हा एचएएलच्या सर्वात मोठ्या व्यापारी भागीदारांपैकी एक असल्याचे वृत्त आहे.

हे ही वाचा:

जम्मू-काश्मीरच्या कठुआमध्ये सुरक्षा दलाने तीन दहशतवाद्यांना घेरले, चकमक सुरु!

Ghibli फोटोचा असा बनवा व्हिडिओ, एकदा करून बघा…

ठाण्यात कचरा गोळा करणाऱ्या महिलेला जेसीबीची धडक, जागीच मृत्यू

IPL FactCheck : चेन्नईसाठी धोनी पनवती बनलाय, सोनू निगमचे ट्वीट व्हायरल

एचआर स्मिथचे वकील निक वॉटसन यांनी न्यू यॉर्क टाइम्सला सांगितले की ही विक्री कायदेशीर होती, उपकरणे भारतीय शोध आणि बचाव नेटवर्कसाठी निश्चित करण्यात आली होती आणि हे भाग लष्करी वापरासाठी डिझाइन केलेले नाहीत, असे ते म्हणाले. तथापि, न्यू यॉर्क टाइम्सने सल्लामसलत केलेल्या कायदेशीर तज्ञांनी असे सूचित केले की ब्रिटिश कंपनीने भारतीय कंपनीला विक्री करताना योग्य ती काळजी न घेतल्याने निर्बंधांचे उल्लंघन केले असावे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
241,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा