पंजाबमधील मोगा येथे शिवसेना गटाच्या जिल्हाध्यक्षाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. या हल्ल्यात एक अल्पवयीन जखमी झाला आहे. पोलिसांनी शुक्रवारी (१४ मार्च ) घटनेची माहिती दिली. ही संपूर्ण घटना गुरुवारी रात्री घडल्याचे सांगितले जात आहे.
पोलिसांनी सांगितले की, जिल्हाध्यक्ष मंगत राय मंगा हे दुध खरेदी करण्यासाठी गेले असता रात्री १० वाजताच्या सुमारास तीन अज्ञात व्यक्तींनी त्याच्यावर गोळीबार केला, परंतु गोळी त्यांच्या ऐवजी एका १२ वर्षीय मुलाला लागली. त्यानंतर मंगत राय मंगा ताबडतोब दुचाकीवरून घटनास्थळावरून पळून गेले, परंतु हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग केला.
पोलिसांनी पुढे सांगितले की, पाठलाग करताना हल्लेखोरांनी पुन्हा मंगा यांच्यावर गोळीबार केला आणि यावेळी त्यांना गोळी लागली. यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले. या घटनेनंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी सांगितले की, गोळीबारात जखमी झालेल्या किशोरवयीन मुलाला प्रथम मोगा येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि नंतर दुसऱ्या रुग्णालयात रेफर करण्यात आले.
हे ही वाचा :
१९ मार्चपूर्वी सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परत येण्याची शक्यता नाहीच
देशभरात होळीचा उत्साह, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान मोदींनी देशवासियांना दिल्या शुभेच्छा!
पॅलेस्टिनी समर्थक निदर्शनांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता
भारताने उपटले पाकिस्तानचे कान!
दरम्यान, उजव्या विचारसरणीच्या विश्व हिंदू शक्तीचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगिंदर शर्मा म्हणाले, “आम्हाला कळले की काही बदमाशांनी मंगा यांची गोळ्या घालून हत्या केली. माहिती मिळताच आम्ही रुग्णालयात पोहोचलो.” आम्हाला न्याय हवा आहे आणि तो मिळवण्यासाठी आम्ही जे काही करू ते करू.”
पोलिस उपअधीक्षक (शहर) रविंदर सिंह यांनी सांगितले की, गुरुवारी रात्री दोन ठिकाणी गोळीबार झाला. “बगियाना बस्ती येथे झालेल्या गोळीबारात एका सलून मालकाला दुखापत झाली. तर दुसऱ्या एका घटनेत, मंगत राय मंगा यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरु केला असून लवकरच आरोपींना अटक केली जाईल, असे अधिकाऱ्याने सांगितले.