31 C
Mumbai
Thursday, March 13, 2025
घरक्राईमनामामहू हिंसाचार: आठ गुन्हे दाखल, ५० जण आरोपी म्हणून घोषित तर १०...

महू हिंसाचार: आठ गुन्हे दाखल, ५० जण आरोपी म्हणून घोषित तर १० जणांची रवानगी तुरुंगात

पोलिसांकडून कारवाईला वेग, जल्लोष रॅलीवर दगडफेक करणाऱ्यांचा शोध सुरू

Google News Follow

Related

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय क्रिकेट संघाने मिळवलेल्या विजयानंतर मध्य प्रदेशातील महू येथे निघालेल्या जल्लोष रॅलीवर जामा मशिदीजवळ दगडफेक झाल्याची घटना घडली होती. यानंतर जाळपोळीच्या घटनाही घडल्या होत्या. दरम्यान, महू येथे गोंधळ घालणाऱ्यांविरुद्ध पोलिसांची कारवाई तीव्र झाली आहे. जामा मशिदीसमोर दगडफेक आणि जाळपोळ केल्याप्रकरणी पोलिसांनी आठ गुन्हे दाखल केले आहेत. शिवाय ५० जणांना आरोपी बनवण्यात आले आहे. आतापर्यंत १० जणांची रवानगी तुरुंगात करण्यात आली असून दोन जणांवर राष्ट्रीय सुरक्षा कायदा (एनएसए) अंतर्गत कारवाई करण्यात येत आहे.

भारताच्या विजयाचा आनंद साजरा करणारी रॅली महू येथील जामा मशीद परिसरातून जात असताना परिसरातील काही लोकांनी दगडफेक करण्यास सुरुवात केली होती. पुढे दोन्ही गटांमध्ये संघर्ष निर्माण झाला आणि अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली. हल्लेखोरांनी दोन वाहने आणि दुकाने पेटवून दिली होती. यानंतर पोलिसांनी कारवाई तीव्र केली आहे. पोलिसांकडून १५० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे स्कॅन करण्यात आल्यानंतर ५० जणांची ओळख पटवून त्यांना आरोपी बनवण्यात आले आहे. १० जणांना तुरुंगात पाठवण्यात आले आहे आणि २ जणांवर एनएसए लावण्यात आला आहे. संवेदनशील भागात अजूनही मोठा पोलिस बंदोबस्त तैनात आहे.

पोलिस ड्रोनच्या माध्यमातून वेगवेगळ्या भागांवर लक्ष ठेवून आहेत. उंच इमारती आणि लहान घरांच्या छतांचीही तपासणी केली जात आहे. सोमवारी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चार गुन्हे दाखल करण्यात आले. यानंतर मंगळवारी आणखी चार गुन्हे दाखल करण्यात आले. महू पोलिस ठाण्याचे एसआय मोहित तोमर यांनी गुन्हा दाखल केला आहे. एसआय मोहित यांनी सांगितले की, ते पट्टी बाजारातील शीतला माता मंदिराजवळ ड्युटीवर होते. जेव्हा त्यांनी लोकांना मिरवणुकीवर दगडफेक करण्यापासून रोखले तेव्हा त्यांच्यावरही दगडफेक करण्यात आली. हल्लेखोरांनी कॉन्स्टेबल वीरेंद्र सिंग आणि कॉन्स्टेबल नरेंद्र सिंग यांच्या दुचाकी पेटवून दिल्या.

दुसरीकडे, एका प्रकरणात तक्रारदार अर्थव यादव यांनी सांगितले की, ते न्यापुरा सुतारखेडी गुजरखेडा येथील रहिवासी असून त्याचे वडील अमित यादव यांच्यासोबत दुचाकीवरून दुकानात जात होता. त्यावेळी अचानक गर्दीने त्यांना घेरले. त्यांना धमकी देण्यात आली की, विजय साजरा करण्यासाठी रस्त्यावर येऊ नका अन्यथा परिणाम वाईट होतील. जमावाने त्याच्यावर आणि त्याच्या वडिलांवर काठ्यांनी हल्लाही केला आणि त्यांच्या दुचाकीचीही तोडफोड केली.

हे ही वाचा : 

संभलचे सीओ अनुज चौधरी यांच्याविरुद्ध वादग्रस्त पोस्ट प्रकरणी अबाज खानला अटक!

दिल्लीमधून २० हून अधिक बांगलादेशी नागरिकांना अटक

जुम्मासाठी होळी उत्सवात दोन तासांचा ब्रेक घ्या; दरभंगाच्या महापौरांचा अजब सल्ला

भारत-नेपाळ सीमेवर बेकायदेशीर घुसखोरी करताना बांगलादेशी नागरिकाला अटक!

महू पोलिसांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी आतापर्यंत ५० हून अधिक आरोपींची ओळख पटवली असून त्यांना आरोपी म्हणून घोषित केले आहे. इतर आरोपींचीही ओळख पटवली जात आहे. बीएनएसएसच्या कलम १७०, १२६,१३५ (३) अंतर्गत दहा जणांना तुरुंगात पाठवण्यात आले आहे. दुसरीकडे, जिल्हाधिकारी आशिष सिंह यांनी दंगलीत सहभागी असलेल्या दोन लोकांवर एनएसए लावला आहे. आरोपींमध्ये सोहेल कुरेशी, रहिवासी बटख मोहल्ला, महू आणि एजाज खान, रहिवासी कांचन विहार खान कॉलनी अशी नावे आहेत. तर, महू येथील प्रकरणाशी संबंधित घटनेचे व्हिडिओ उपलब्ध करून देण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
235,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा