दिल्लीतील महिपालपूरमध्ये एका परदेशी महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर हॉटेलच्या लिफ्टमध्ये दुसऱ्या एका व्यक्तीने तिचा विनयभंग केल्याची बाबही समोर आली आहे. यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. ही महिला मूळची ब्रिटिश असून सोशल मीडियाद्वारे संपर्क करून ही महिला भारतात आली होती. पोलिसांनी आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू केला आहे.
संबंधित घटना नैऋत्य दिल्लीतील महिपालपूर भागात घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेने सांगितले की, ती आरोपीला सोशल मीडियावर भेटली. पुढे ते नियमितपणे बोलू लागले आणि तिने त्याला प्रत्यक्ष भेटण्यासाठी भारतात येण्याचा निर्णय घेतला. यानंतर भारतात उतरल्यानंतर तिने इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील महिपालपूर येथे हॉटेल रूम बुक केली. मंगळवारी आरोपी मित्र हॉटेलमध्ये या महिलेला भेटण्यासाठी गेला. तथापि, ब्रिटिश महिलेला तो तिच्याशी अनुचित वर्तन करण्याचा प्रयत्न करत असल्याचे जाणवल्यानंतर दोघांमध्ये जोरदार वाद झाला.
पीडितेने आरोप केला आहे की त्यानंतर आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. ब्रिटिश महिलेने दावा केला आहे की तिने नंतर अलार्म वाजवला आणि हॉटेलच्या रिसेप्शनवर पोहोचण्यात यशस्वी झाली. तथापि, दुसऱ्या एका पुरूषाने तिला मदत करण्याच्या बहाण्याने हॉटेलच्या लिफ्टमध्ये तिचा विनयभंग केला. बलात्कार आणि विनयभंगाच्या आरोपाखाली दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी या घटनेची माहिती ब्रिटिश उच्चायुक्तालयालाही दिली आहे. घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
हे ही वाचा :
होळीनिमित्त लखनऊमध्ये विकली जातेय १ लाख रुपयांची चांदीची पिचकारी
सुनीता विल्यम्स यांचे पृथ्वीवर परतणे पुन्हा लांबणीवर; तांत्रिक समस्येमुळे क्रू-10 चे प्रक्षेपण रद्द
रशियाने लष्करी आक्रमण सुरू ठेवल्यास आर्थिक परिणामांना सामोरे जावे लागेल
जाफर एक्स्प्रेसचे क्लियरन्स ऑपरेशन पूर्ण; ३३ बलूच लिबरेशन आर्मीच्या अपहरणकर्त्यांचा खात्मा
कर्नाटकातील कोप्पल जिल्ह्यात तीन तरुणांनी इस्रायलमधील एका पर्यटक तरुणीसह एका भारतीय तरुणीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली होती. या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात असतानाचं आता दिल्लीतून ही घटना समोर आली आहे. कर्नाटकमधील घटनेतील तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.