29.6 C
Mumbai
Saturday, October 24, 2026
घरदेश दुनियादानाच्या बहाण्याने वृद्धांना लुटणारा ‘इराणी’ अंधेरी पोलिसांच्या जाळ्यात

दानाच्या बहाण्याने वृद्धांना लुटणारा ‘इराणी’ अंधेरी पोलिसांच्या जाळ्यात

३० गुन्ह्यांचा उलगडा

Google News Follow

मंदिर किंवा मस्जिदमध्ये दान देण्याच्या बहाण्याने वृद्ध महिला-पुरुषांना गंडा घालणाऱ्या सराईत इराणी आरोपीला अंधेरी पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून तब्बल ३० गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे. अंधेरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने तांत्रिक तपास आणि सीसीटीव्हीच्या आधारे ही कारवाई केली.

८ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी अडीचच्या सुमारास अंधेरी परिसरात एका वृद्धाकडे अनोळखी इसम गेला. ‘इधर मस्जिद किधर है, हमने नया सोने का दुकान शुरू किया है, सौगात देनी है,’ असे सांगत त्याने विश्वास संपादन केला. त्यानंतर ५०० रुपयांच्या दोन नोटा देत गळ्यातील सुमारे एक तोळ्याची सोन्याची चैन पूजेसाठी फुल लावतो, असा बहाणा करून घेतली आणि क्षणार्धात पसार झाला. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला अडीवली, कल्याण (पूर्व) येथून ताब्यात घेतले. बसिम अब्यास सिराज उर्फ वसीम जाफरी उर्फ वसीम इराणी (३५) असे त्याचे नाव असून तो मूळचा आंबिवली परिसरातील आहे. १७ फेब्रुवारी रोजी त्याला अटक करण्यात आली असून सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. त्याच्याकडून चोरीस गेलेली एक तोळ्याची सोन्याची चैन जप्त करण्यात आली.

हे ही वाचा:

इराणनंतर पाकिस्तानचा गेम?

व्हेनेझुएलाचे कच्चे तेल पुन्हा भारताकडे

शेअर बाजाराची तेजी ओसरली

एपस्टीन प्रकरणावरून बिल गेट्स यांची जाहीर माफी

आरोपीविरुद्ध मुंबई, ठाणे, रायगड, सुरत तसेच तेलंगणा येथे चोरी आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. अंधेरी, ट्रॉम्बे, एमआयडीसी, विलेपार्ले, दहिसर, जोगेश्वरी, वनराई, कुरार आणि मेघवाडी या पोलीस ठाण्यांतील गुन्ह्यांचाही उलगडा झाला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी कल्याण येथे भाड्याच्या घरात लपून राहत होता. गुन्हा केल्यानंतर मोटारसायकलवरून तो कल्याणकडे पसार होत असे. मंदिर किंवा मस्जिदीत हातात फुले घेऊन आलेल्या वृद्धांच्या गळ्यातील दागिन्यांना ‘आशीर्वादासाठी फुल लावतो’ असे सांगून चैन हातात घेणे आणि ती हुशारीने बदलून नेणे, ही त्याची कार्यपद्धती होती.
या कारवाईबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अंधेरी पोलिसांच्या पथकाने उल्लेखनीय कामगिरी बजावली असून पुढील तपास सुरू आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा