भारतात उपलब्ध होणार आणखी एक लस!!

भारतात उपलब्ध होणार आणखी एक लस!!

संपूर्ण जग सध्या कोविडच्या महामारीचा सामना करत आहे. याकाळात लसीकरण हा एकमेव उपाय असल्याचे दिसत आहे. भारत जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहिम राबवत आहे. भारताच्या लसीकरणात आणखी एका लसीची वाढ होणार असल्याची चिन्हे दिसत आहे.

अहमदाबाद येथील झायडस कॅडिलाच्या लसीला लवकरच आपत्कालिन वापरासाठी मान्यता मिळण्याची शक्यता आहे. झायडसच्या तीन मात्राच्या झाय-कोव्ह-डी या लसीला मान्यता मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांनी राज्यसभेत प्रश्नोत्तरांच्या वेळी ही माहिती दिली. ते म्हणाले “ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यात आणखी चार लसी उपलब्ध होण्याची सरकारला आशा आहे. याकाळात भारतीय बनावटीच्या लसी उपलब्ध होतील. बायोलॉजिकल इ आणि नोव्हार्टिस या लसी देखील लवकरच होतील आणि झायडस कॅडिलाच्या लसीला देखील लवकरच आपात्कालिन तज्ज्ञांच्या समितीकडून वापरासाठी मान्यता मिळू शकते.”

हे ही वाचा:

ऑगस्ट क्रांतिदिनी काँग्रेस नेत्याच्या फेसबुकवर ‘कांती’च्या मशाली

शिवसेना राष्ट्रवादीच्या खुंटीला बांधल्याचे चित्र

चारशे कोटींचे खाशाबांचे स्टेडियम महाराष्ट्रात का नाही?

श्रीरामपूरमध्ये संतापाची लाट; लव्ह जिहादचे जाळे टाकून अल्पवयीन मुलीला पळवले

झायडसने गेल्या महिन्यात लसीच्या आपात्कालिन वापरासाठी मान्यता मिळावी यासाठी अर्ज केला होता. झायडसने औषध नियंत्रकाकडे तीन मात्रांच्या लसीसाठी अर्ज केला होता. झायडसचा दरवर्षी १० ते १२ कोटी लसींचे उत्पादन करण्याचा विचार आहे.

कंपनीने त्यांच्या लसीसाठी आत्तापर्यंतची सर्वात मोठी चाचणी केली होती. औषध नियंत्रकाकडून मोठ्यांवरील आपात्कालिन वापरासाठी मान्यता मिळण्याची शक्यता आहे. डीसीजीआयकडून झायकोव्ह-डी लसीसाठी अधिक डेटा सकट पुन्हा अर्ज करण्यास सांगितले होते.

Exit mobile version