झोजिला जवळ पर्यटन केंद्र उभे करण्यासाठी सरकार प्रयत्न करणार

झोजिला जवळ पर्यटन केंद्र उभे करण्यासाठी सरकार प्रयत्न करणार

श्रीनगर- लेह महामार्गावरील झोजिला बोगद्याजवळ हिवाळी पर्यटन केंद्र उभे करण्यासाठीच्या चर्चेला सरकारने सुरूवात केली. सरकार सर्व आधुनिक सुखसोईंनी युक्त असे पर्यटन केंद्र उभारू इच्छित आहे. जम्मू-काश्मिर आणि लडाख केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासनाच्या सहाय्याने हा प्रकल्प राबविण्यात येईल. 

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे केंद्रिय मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जम्मू-काश्मिर आणि लडाखच्या प्रशासनाचे प्रतिनीधी, जम्मू-काश्मिरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा, सीमा सड़क संघटनेचे अधिकारी यांच्याशी या संदर्भात बैठक पार पडली.

या प्रकल्पात काम करणाऱ्या सर्व सहयोगी संस्थांत सुसुत्रता असावी यासाठी एका उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात येईल. याठिकाणी पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटनकेंद्राचे निर्माण करण्याचा मंत्र्यांचा मनसुबा असल्याचे सुत्रांकडून समजले आहे. 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वित्झरलँडमधील दावोसपेक्षा अधिक सुंदर शहर वसवण्याचा मानस बोलून दाखवला आहे. लेहकडे जाण्यासाठी या महामार्गाचा वापर करणारे अनेक पर्यटक द्रास-कारगील भागात थांबतात. या संपूर्ण परिसराचाच पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्याचा सरकारचा विचार आहे. 

Exit mobile version