झिम्बाब्वे आणि आयर्लंड यांच्या दरम्यान गुरुवारी एक थरारक सामना खेळला गेला. या सामन्याचा निकाल शेवटच्या चेंडूवर लागला आणि झिम्बाब्वेच्या संघाने एका विकेटने विजय नोंदवला. झिम्बाब्वेच्या हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांच्या टी २०मालिकेतील पहिला सामना झाला. नाणेफेक हरल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरलेल्या पाहुण्या संघाने २० षटकांत आठ विकेट गमावून १४७ धावा केल्या. यजमान संघाचा कर्णधार सिकंदर रजा याने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. कर्णधाराने ६५ धावा करून फलंदाजीतही योगदान दिले. शेवटच्या चेंडूवर एक विकेटने विजय मिळवून झिम्बाब्वेने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
झिम्बाब्वेमध्ये पहिल्यांदाच फ्लड लाइट्समध्ये सामना खेळवला गेला. खेळपट्टीवर भेगा पडल्या असल्याने ती फलंदाजांसाठी अनुकूल नव्हती. त्यामुळे या सामन्यात फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. सिकंदर रजा याचा अपवाद वगळता कोणीही फलंदाज चांगल्या धावा करू शकला नाही. पहिल्यांदा फलंदाजी करताना आयर्लंडचा सलामीचा फलंदाज एँड्र्यू बालबर्नी (३१)याचा अपवाद वगळता कोणीही फलंदाज ३० धावांहून अधिक धावा करू शकले नाहीत. झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रजा याने बालबर्नी आणि हॅरी टॅक्टरसह तीन विकेट घेऊन आयर्लंडला १५० धावसंख्येच्या आतच रोखले.
हे ही वाचा:
केसीआर यांना धोबीपछाड देणाऱ्या काँग्रेसच्या रेवंथ रेड्डींनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ
राज्यातील १० महानगरांमध्ये पिंक रिक्षा सुरू करण्याबाबत आराखडा सादर करा
यजमान संघ लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानावर उतरला. झिम्बाब्वेने पॉवरप्लेमध्ये २१ धावसंख्येवर स्वतःचे दोन मुख्य फलंदाज गमावले होते. त्यानंतर सिकंदर रजाने ४२ चेंडूंमध्ये पाच चौकार आणि दोन षटकारांसह ६५ धावा केल्या. मात्र ते बाद झाल्यानंतर संघाची अवस्था पुन्हा वाईट झाली. झिम्बाब्वेला विजयासाठी नऊ चेंडूंमध्ये ११ धावा हव्या होत्या आणि हातात केवळ दोन विकेट होत्या.
शेवटच्या षटकात झिम्बाब्वेला विजयासाठी नऊ धावांची आवश्यकता होती. रिचर्ड नगारवा याने चौथ्या चेंडूवर एक चौकार लगावला, मात्र पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला. शेवटच्या चेंडूवर यजमान संघाला ड्रॉची तर सुपर ओव्हरसाठी एका धावेची आवश्यकता होती. तर, आयर्लंडला सामना जिंकण्यासाठी एक धाव हवी होती. तेव्हा ब्लेसिंग मुजारबानीच्या संघाने दोन धावा करून झिम्बाब्वेच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.