25 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरविशेषनक्षलवादावर शून्य सहनशीलता; वर्षभरात २०७ नक्षलवाद्यांचा खात्मा

नक्षलवादावर शून्य सहनशीलता; वर्षभरात २०७ नक्षलवाद्यांचा खात्मा

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा नक्षलवाद संपवण्याचा इशारा

Google News Follow

Related

सुरक्षा दलाकडून आणि प्रशासनाकडून नक्षलवाद विरोधी मोहीम उघडण्यात आली असून नक्षलग्रस्त राज्यात कठोरपणे हे मोहीम राबवण्यात येत आहे. दरम्यान, छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दलांनी १० नक्षलवाद्यांचा खात्मा केला. घटनास्थळावरून सर्वांचे मृतदेह आणि तीन स्वयंचलित शस्त्रे जप्त करण्यात आली. विशेष म्हणजे यावर्षीच्या आकडेवारीनुसार आता पर्यंत सुरक्षा दलाकडून २०० हुन अधिक नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

कोंटा आणि किस्टाराम एरिया कमिटीच्या नक्षलवाद्यांसोबत DRF आणि CRPF यांच्यात दंतेसपुरम, कोराजुगुडा, भेज्जीच्या नागरामच्या जंगलात चकमक झाली. यात १० नक्षली मारले गेले. आणखी नक्षलवाद्यांचा शोध या परिसरात सुरू आहे. यावर्षी १ जानेवारी ते २२ नोव्हेंबरपर्यंत तब्बल २०७ नक्षलवादी मारले गेले आहेत. तसेच त्यांच्याकडील शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत.

ओडिशा आणि गरिआबंदला लागून असलेल्या उदांती अभयारण्याच्या जंगलात गुरुवारीही पोलिस- नक्षलवादी चकमक झाली होती. नक्षलवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळताच गरिआबंद पोलिसांनी संयुक्त शोध मोहीम सुरू केली. या ऑपरेशनमध्ये गारियाबंद डीआरजी, कोब्रा २०७ बटालियन, ओडिशा एसओजी, सीआरपीएफ २११ आणि ६५ बटालियनचे सुमारे २०० जवान सहभागी झाले होते. यावेळी नक्षलवाद्यांच्या अड्ड्यातून पोलिसांनी एक गोळी रायफल, नक्षलवादी साहित्य, मोठ्या प्रमाणात उबदार कपडे आणि दैनंदिन वापराच्या वस्तू जप्त केल्या आहेत.

हे ही वाचा:

फडणवीस मुख्यमंत्री झाले तर आम्ही सहर्ष स्वीकार करू!

विनोद तावडेंनी राहुल गांधी, खर्गेंना पाठविली १०० कोटींची नोटीस!

बूमराहच्या दणक्याने कांगारू कोलमडले

शनिवारी महाराष्ट्राच्या भवितव्याचा होणार निर्णय

चकमकीबाबत सीएम साई म्हणाले की, सुकमामध्ये जवानांना मोठे यश मिळाले आहे. सरकार नक्षलवादाबद्दल शून्य सहनशीलतेच्या धोरणावर काम करत आहे. बस्तरमधील विकास, शांतता आणि नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करणे ही त्यांच्या सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे.

उपमुख्यमंत्री विजय शर्मा म्हणाले की, सैनिक नक्षल आघाडीवर अदम्य साहस आणि शौर्य दाखवून सातत्याने यश मिळवत आहेत आणि आता माओवाद बस्तरमध्ये शेवटचे श्वास मोजत आहे. यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही नक्षलवाद संपवू असा इशारा दिलेला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा