कालच्या दिवसात ओडिशाची राजधानी, भूबनेश्वर येथील नागरिकांनी शून्य सावली दिनाचा आनंद घेतला. त्यावेळी अनेकांनी फोटो काढले. हे फोटो आता समाजमाध्यमांवर देखील प्रसिद्ध झाले आहेत.
याबाबत माहिती देताना पथानी समंत तारांगणाचे उप-संचालक सुभेंदू पटनायक यांनी सांगितले की अनेक लोकांनी आज शुन्य सावली दिवसाचा आनंद घेतला. हा वर्षातून दोन वेळा होतो, ज्यावेळेला सुर्य बरोबर डोक्यावर येतो. आज आम्ही या दिवसाचा अनुभव घेतला.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार याचा अनुभव उद्या कटक येथे घेता येणार आहे. मुंबईत मात्र ही खगोलिय घटना १४ मे रोजी घडून गेली आहे.
हे ही वाचा:
इंडियन व्हेरिअंट नावावरून केंद्र सरकारने समाजमाध्यमांना झापले
सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दिलासा
चक्रीवादळापेक्षा जास्त वेगाने मुख्यमंत्र्यांचा दौरा
२०२१ च्या अखेरपर्यंत सर्व प्रौढांचे लसीकरण करणार
शून्य सावली दिवस ही विशेष खगोलिय घटना आहे. ज्यावेळेला सूर्य एखाद्या वस्तूच्या बरोबर डोक्यावर येतो, त्यावेळेला त्या वस्तूची किंवा व्यक्तीची सावली अजिबात पडत नाही.
शून्य सावली दिवस केवळ साडे तेविस अक्षांश उत्तर (कर्कवृत्त) आणि साडे तेविस अक्षांश दक्षिण (मकरवृत्त) या दरम्यान आढळून येतो. एखाद्या जागेवरील शून्य सावली दिवस पृथ्वीवरील त्या जागेच्या अक्षांशांनुसार बदलत जातो. सूर्याच्या कर्कवृत्त ते मकरवृत्तादरम्यान होणाऱ्या प्रवासात हा दिवस वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या तारखांना येतो.