विराट कोहलीच्या ९५ धावांनी युवराज सिंग रोमांचित

विराट कोहलीच्या ९५ धावांनी युवराज सिंग रोमांचित

धरमशाला येथील एचपीसीए स्टेडिअममध्ये रविवारी रंगलेल्या सामन्यात क्रिकेटपटू विराट कोहलीच्या ९५ धावांच्या जोरावर भारताने न्यूझीलंडचा चार विकेटने पराभव केला. विराट कोहलीच्या या अभूतपूर्व कामगिरीचे माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंग याने कौतुक केले आहे.

कोहली याने १०४ चेंडूंमध्ये ९५ धावा तडकावल्या. त्यात आठ चौकार आणि दोन षटकारांचा समावेश आहे. शतकाच्या निकट आलेल्या कोहलीला मॅट हेन्री याने बाद केले. ग्लेन फिलिप्स याने त्याला झेलबाद केले.

२७४ धावांचा पाठलाग करताना भारताने १२ चेंडू राखीव ठेवत हे लक्ष्य सहज पार केले. या सामन्यात कोहलीला सचिन तेंडुलकरच्या ४९ एकदिवसीय शतकांची बरोबरी साधण्याची संधी होती. तो या विक्रमाच्या निकटही पोहोचला होता. मात्र पाच धावा शिल्लक असताना तो झेलबाद झाल्याने भारतीय चाहत्यांची निराशा झाली.

सन २०११मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेतील भारतीय संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावणाऱ्या युवराज सिंग याने विराट कोहलीच्या या खेळीचे भरभरून कौतुक केले आहे. संपूर्ण सामन्याचा ताण एकट्यावर घेऊन त्याने शेवटपर्यंत चांगल्या खेळीचे प्रदर्शन केले, अशा शब्दांत त्याने कोहलीवर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला. त्याने मोहम्मद शामी आणि रवींद्र जाडेजा यांच्या गोलंदाजीचेही कौतुक केले. विश्वचषक स्पर्धेत पाच विकेट घेणारा मोहम्मद शामी हा एकमेव भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे.

हे ही वाचा:

भटक्या कुत्र्यांमुळे डोक्याला इजा होऊन ‘वाघ बकरी चहा’चे संचालक पराग देसाई यांचा मृत्यू

कर्नाटकमध्ये स्पर्धा परीक्षांसाठी मुस्लीम विद्यार्थींनीना हिजाब घालण्यास काँग्रेस सरकारची परवानगी

गड आला; पण शतक हुकले, विराटची विक्रमाची संधी हिरावली

बावनकुळेंची नाही, शरद पवारांनी स्वतःच्या पक्षाची चिंता करावी!

न्यूझीलंडवरील या विजयामुळे भारत १० गुणांसह विश्वचषकातील गुणतक्त्यात पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. तसेच, सध्या भारताची धावगतीही +१.३५३ आहे. भारताने आतापर्यंतचा एकही सामना गमावलेला नाही. आता भारताचा पुढील सामना जोस बटलरच्या इंग्लंडशी रविवार, २९ ऑक्टोबर रोजी लखनऊ येथील अटलबिहारी वाजपेयी स्टेडियमवर होणार आहे.

Exit mobile version