भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगच्या आईच्या घरी चोरी झाल्याची बातमी समोर आहे.युवराज सिंगच्या आईने आता याप्रकरणी हरियाणा पोलिसांकडे तक्रार केली आहे.युवराज सिंगची आई शबनन सिंग यांचे घर हरियाणातील पंचकुला येथे आहे.या घरात ही चोरी झाली आहे.मात्र, चोरीची ही घटना सहा महिन्यांपूर्वीची आहे.शबनन सिंग यांच्या तक्रारीनंतर सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
शबनम सिंग यांनी एमडीसी पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत त्यांनी सांगितले की, गेल्या वर्षी सप्टेंबर २०२३ मध्ये एमडीसीच्या हाऊस-१८ मध्ये चोरी झाली होती. त्यांनी घरात दोन नोकर ठेवले असून त्यांनीच चोरी केल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. घरातील कपाटातून सोन्याचे दागिने आणि ७५ हजार रुपये चोरीला गेल्याचे शबनम यांनी पोलिसांना सांगितले.
हे ही वाचा:
आईकडून ११वर्षीय मुलीची हत्या, स्वतःही आत्महत्येचा प्रयत्न!
अयोध्या राम मंदिराच्या पार्श्वभूमीवर अर्थ मंत्रालयाने जारी केले चांदीचे नाणे
शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून विद्यार्थ्याचा मृत्यू
भाजपला माझा प्रामाणिकपणा दिसला म्हणून तिकीट मिळाले!
ललिता देवी आणि शैलेंद्र दास अशी नोकरांची नावे आहेत.त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सध्या एमडीसी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या एफआयआरनुसार एकूण १ लाख ७५ हजार रुपयांच्या मालमत्तेची चोरी झाली आहे.
शबनमने तक्रारीत म्हटले आहे की, तिचे गुडगावमध्येही घर असून ती काही काळ तेथे राहायला गेली होती. ५ ऑक्टोबर २०२३ रोजी ती घरी परतली तेव्हा घराच्या वरच्या मजल्यावरील खोलीतून दागिने आणि पैसे गायब असल्याचे तिच्या लक्षात आले.सर्व नोकरांची चौकशी केल्याचे त्यांनी सांगितले.मात्र, नंतर दोन्ही आरोपी नोकरी सोडून पळून गेले, असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.