30 C
Mumbai
Monday, November 18, 2024
घरविशेषयुसुफ पठाण तृणमूलमधून लढणार लोकसभा!

युसुफ पठाण तृणमूलमधून लढणार लोकसभा!

टीएमसीने नावे केली जाहीर

Google News Follow

Related

माजी क्रिकेटपटू युसूफ पठाणही यावेळी लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे.आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेस पक्षाने पश्चिम बंगालमधील लोकसभेच्या सर्व ४२ जागांसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत माजी क्रिकेटपटू युसूफ पठाणच्या नावाचाही समावेश आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोलकाता येथील सभेत युसूफ पठाणच्या नावाची घोषणा केली.टीएमसीने युसूफला बहरामपूरमधून उमेदवारी दिली आहे.युसूफ पठाण यांचा सामना काँग्रेस पक्षाचे नेते अधीर रंजन चौधरी यांच्याशी होणार आहे.

कोलकाता येथील मेगा रॅली दरम्यान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला कोणताही पाठिंबा देणार नसल्याचे देखील स्पष्ट केले आहे.त्यांनी सर्व ४२ जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत.या यादीत कांठी येथील उत्तम बारीक, घाटल येथील अभिनेते देब, झारग्रामचे पद्मश्री कालीपदा सोरेन, मेदिनीपूरचे जून मालिया, पुरुलियाचे शांती राम महतो, बांकुरा येथील अरुप चक्रवर्ती, वरदमन दुर्गापूर- कीर्ती आझाद, बीरभूमचे शताब्दी रॉय, बिष्णुपूरचे सुदाता मंडल खान, विष्णुपूरचे सुदाता मंडल खान यांचा समावेश आहे.तसेच आसनसोलमधून शत्रुघ्न सिन्हा यांना लोकसभेचे तिकीट, कृष्णनगरमधून महुआ मोईत्रा, राणाघाटातून मुकुटमणी अधिकारी, बनगावमधून बिस्वजित दास आणि बराकपूरमधून पार्थ भौमिक यांना लोकसभेचे तिकीट मिळाले आहे.

हे ही वाचा:

एवढ्याशा कारणामुळे तिने त्या पुरुषाच्या कानाचा लचका तोडला…

जुनागडमधील बेकायदेशीर दर्गा जमीनदोस्त

हिंदूविरोधी प्रतिमा बदलण्यासाठी ममतांकडून रामनवमीला सार्वजनिक सुट्टी

भारत पेट्रोलियमची जेतेपदाची हॅटट्रिक

याशिवाय दमदममधून सौगता रॉय, बारासातमधून काकोली घोष दस्तीदार, बशीरहाटमधून हाजी नूरुल इस्लाम, जयनगरमधून प्रतिमा मंडल, मथुरापूरमधून बापी हलदर, डायमंड हार्बर- अभिषेक बॅनर्जी, जाधवपूरमधून शायनी घोष, कोलकाताहून मामा रॉय, दक्षिणेतून सुदीप रॉय. कोलकाता उत्तर बंदोपाध्याय, हावडा येथील प्रसून बॅनर्जी फुटबॉलपटू, उलुबेरियातील साजदा अहमद, श्रीरामपूर येथील कल्याण बॅनर्जी, हुगळीमधून रचना बॅनर्जी, आरामबागमधून मिताली बाग आणि तमलूकमधून देबांशू भट्टाचार्य यांना तिकिटे मिळाली आहेत.या यादीत ममता बॅनर्जी यांनी ३२ नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.

दरम्यान, इंडी आघाडीतील मतभेदानंतर ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये एकट्याने निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती.मात्र, आता उमेदवारांची नवे जाहीर झाल्यानंतर हे स्पष्ट झाले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा