युट्युबर आणि बिग बॉस ओटीटी-२ चा विजेता एल्विश यादवला नोएडा पोलिसांकडून अटक करण्यात आली होती.त्यानंतर आज त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार होतं.न्यायालयाने एल्विश यादवला १४ दिवसांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.सापाच्या विष तस्करी प्रकरणी त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
गेल्या वर्षी ३ नोव्हेंबर रोजी नोएडाच्या सेक्टर ५१ मधील बँक्वेट हॉलमध्ये एक कार्यक्रम पार पडला होता.या कार्यक्रमात एल्विश यादवने सापाचे विष पुरविले होते, असा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होता.फॉरेन्सिक अहवालाने देखील पुष्टी केली होती की, प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवलेला विषाचा नमुना कोब्राचा होता.यानंतर आज (१७ मार्च) नोएडा पोलिसांनी त्याची चौकशी करत त्याला अटक केली.
हे ही वाचा:
हिमांशू, ओजस्वीने जिंकली सुवर्णपदके
‘मी पुन्हा येईन म्हटलं’…आलो अन येताना दोन पक्ष फोडून आलो!
यूट्यूबर एल्विश यादवला नोएडा पोलिसांनी केली अटक!
एल्विश यादवला अटक करत सुरजपूर न्यायालयात आज हजर करण्यात आले.यावेळी न्यायालयाने त्याला १४ तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.लुकसर तुरुंगात त्याची रवानगी करण्यात येणार आहे.नोएडा पोलिसांनी एल्विश यादवविरुद्ध आयपीसी, वन्यजीव संरक्षण कायदा आणि एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. एनडीपीएस कायद्यांतर्गत एल्विश दोषी आढळल्यास त्याला १० वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो.