युट्युबर आणि बिग बॉस ओटीटी-२ चा विजेता एल्विश यादववर नोएडा पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे.नोएडा येथील रेव्ह पार्टीमध्ये सापाचे विष पुरवल्याच्या प्रकरणात सहभागी असलेल्या यूट्यूबर एल्विश यादवला स्थानिक पोलिसांनी रविवारी चौकशीनंतर अटक केली आहे.
गेल्या वर्षी ३ नोव्हेंबर रोजी नोएडाच्या सेक्टर ५१ मधील बँक्वेट हॉलमध्ये एक कार्यक्रम पार पडला होता.या कार्यक्रमात एल्विश यादवने सापाचे विष पुरविले होते, असा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होता.फॉरेन्सिक अहवालाने देखील पुष्टी केली होती की, प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवलेला विषाचा नमुना कोब्राचा होता.
हे ही वाचा:
उद्धव ठाकरेंना गुडबाय; आमदार आमशा पाडवी एकनाथ शिंदेकडे!
शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, त्यापेक्षा माझं दुकान बंद करेन!
मुख्यमंत्री केजरीवाल यांना नवीन प्रकरणात ईडीकडून समन्स!
गुजरातमध्ये वसतिगृहाच्या परिसरात नमाज पढणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांवर हल्ला!
रेव्ह पार्टीमध्ये सापाच्या विषाचा वापर केल्याप्रकरणी नोएडा पोलिसांनी ८ नोव्हेंबर रोजी एल्विश यादवविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता. एल्विश यादव हा देखील या प्रकरणात आरोपी आहे. या प्रकरणी पोलिसांनी राहुल यादव नावाच्या एका आरोपीसह पाच जणांना अटक केली होती.पोलिसांनी त्यांच्याकडून २० मिली सापाचे विषही जप्त केले होते.
दरम्यान,या प्रकरणाची माहिती देताना नोएडाचे डीसीपी विद्या सागर मिश्रा यांनी सांगितले की, एल्विश यादवला नोएडा पोलसांनी चौकशीसाठी बोलाविले होते. चौकशीनंतर त्याला अटक करण्यात आली. आज त्याला सुरजपूर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.