पत्रकार आशुतोष आणि प्रोफेसर आनंद रंगनाथन चर्चेदरम्यान एकमेकांना भिडले

उडाली शाब्दिक चकमक

पत्रकार आशुतोष आणि प्रोफेसर आनंद रंगनाथन चर्चेदरम्यान एकमेकांना भिडले

टाइम्स नाऊ नवभारतच्या चॅनेलवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मिळालेल्या जामिनासंदर्भात चर्चा सुरू असताना पूर्वाश्रमीचे पत्रकार आणि आताचे युट्युब विश्लेषक आशुतोष आणि प्रोफेसर आनंद रंगनाथन यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली. प्रकरण अगदी हातघाईवर आले. दोघेही एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यापर्यंत प्रकरण चिघळले होते.

नाविका कुमार या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालक होत्या. त्यावेळी केजरीवाल यांना मद्य घोटाळ्याप्रकरणी जामीन मिळाल्याच्या प्रकरणावर चर्चा सुरू होती. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घरी गणपतीसाठी गेलेले असतानच्या फोटोचीही चर्चा सुरू झाली. त्यावर आनंद रंगनाथन यांनी पत्रकार कुणाच्याही घरी जातात, कुठेही भेटतात, मागच्या दरवाजाने जातात, पुढच्या दरवाजाने जातात पण त्यांच्या प्रामाणिकतेवर शंका घेतली जात नाही, असा दावा केला. त्यावर आशुतोष वैतागले आणि मी या चर्चेत भाग घेणार नाही म्हणत त्यांनी मायक्रोफोन काढला. तेव्हा नाविका कुमार यांनी त्यांना थांबवले आणि रंगनाथन यांना आपले मत मांडण्याचा अधिकार आहे, हे सांगितले.

हे ही वाचा:

वंदे भारत ट्रेनवर दगडफेक करणाऱ्या पाच जणांच्या आवळल्या मुसक्या

पंतप्रधान निवासस्थानी ‘दीपज्योती’चे आगमन!

जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवाद शेवटचे श्वास मोजतोय

विनेशचा दावा खोटा!; ऑलिम्पिकमध्ये कोणतीही मदत मिळाली नसल्याचा केला होता आरोप

आशुतोष यांनी रंगनाथन यांचे हे वक्तव्य आपल्याबाबत होते असा समज केला. तेव्हा नाविका कुमार म्हणाल्या की, मीदेखील इथे उपस्थित आहे, मी पण पत्रकार आहे. त्यातून हा वाद आणखी वाढला. आशुतोष यांनी रंगनाथन यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा रंगनाथन म्हणाले की, आरडाओरडा बंद करा, मी तुमचे वडील नाही. तेव्हा आशुतोष म्हणाले की, हे सतत माझ्याबद्दल बोलत आहेत. अंगावर धावून जात असल्याचे पाहून रंगनाथन यांनीही पुढे या म्हणून आशुतोष यांना आव्हान दिले. तेव्हा नाविका कुमार यांनी दोघांनाही थांबवत आपण सगळे सुशिक्षित आहोत असे म्हणत प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला.

 

Exit mobile version