‘स्ट्रिंग’ या लोकप्रिय यु ट्युब चॅनलचा एक ताजा व्हिडीओ यु ट्युबने हटवला आहे. काही भारतीय माध्यमांना हाताशी धरून सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय प्रोपोगंडाचा पर्दाफाश या व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आला होता. या व्हिडिओला जनतेचा भरपूर प्रतिसाद मिळत असून सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. पण अचानक आता यु ट्युबने हा व्हिडीओ काढून टाकला आहे त्यामुळेच भारत विरोधी शक्तींना यु ट्युब अभय देताय का असा सवाल उपस्थित होत आहे.
‘स्ट्रिंग’ या भारतीय यु ट्युब चॅनेलने बुधवारी ‘अरेस्ट राठी, झुबेर, बरखा नाऊ! (ग्रेटा टूलकिट एक्सपोज्ड)’ या नावाचा एक व्हिडीओ अपलोड केला होता. या व्हिडिओच्या माध्यमातून जॉर्ज सोरोस, ओपन सोसायटी फाउंडेशन आणि भारतातील काही माध्यमे यांचा कसा संबंध आहे याची पोलखोल केली होती. काही तासातच हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आणि काही लाख लोकांनी पहिला. पण यु ट्युबने अचानक हा व्हिडीओ हटवला आहे. हा व्हिडीओ यु ट्युबच्या धोरणाचे उल्लंघन करतो असे कारण यु ट्युबने दिले आहे.
हे ही वाचा:
‘स्ट्रिंग’ हा राष्ट्रीय विचारांनी प्रेरित होऊन काम करणारा यु ट्युब चॅनेल असून भारतीय नागरिकांमध्ये त्याची प्रचंड लोकप्रियता आहे. या चॅनेलचे सध्या यु ट्युब वर चार लाखांपेक्षा अधिक सबस्क्रायबर्स आहेत.