मुलींची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. यामध्ये भर म्हणजे लग्नसाठीसुद्धा मुलींच्या मुलांकडून अपेक्षा वाढल्या आहेत. यादरम्यान, लग्नासाठी मुली मिळत नसल्याने मुलगी द्या म्हणत एक अनोखे आंदोलन सोलापूरमध्ये तरुणांनी काढले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील तरुणांनी हा अनोखा मोर्चा काढला होता. ज्योती क्रांती परिषदेच्या वतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. नवरदेवाच्या वेशात नटून तरुण घोड्यावरून मोर्चात आले होते. नवरदेवांचा मुंडवळ्या बांधून आम्हाला बायको मिळवून द्या, अशी घोषणाबाजी मुलं करत होते. मोठ्या प्रमाणात अविवाहित मुले मोर्चात सहभागी झाले होते. या तरुणांनी आपल्या समस्या जिल्हयाधिकाऱ्यांपूढे मांडल्या. या मोर्चाचे नेतृत्व ज्योती क्रांती परिषदेचे संस्थापक रमेश बारस्कर यांनी केले.
यावेळी रमेश बारस्कर म्हणाले, लग्न होत नसल्याने तरुण शक्ती कमकुवत होत आहे. यांना सशक्त करणे ही सरकारची जबाबदारी असून याबाबत सरकारने विचार करावा. त्यामुळे या मोर्चात तरुणांनी डोक्याला नवरदेवांच्या मुंडवळ्या बांधल्या होत्या. वेळेत लग्न जमत नसल्याने मुले व्यसनाधीन होत आहेत, त्यामुळे सरकारने या कडे लक्ष द्यावे अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली आहे.
हे ही वाचा :
ज्ञानी, धर्माभिमानी शीख गुरू गोविंदसिंह
सुप्रिया सुळे, आदित्य ठाकरे माफी मागणार काय ?
आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा, नितेश राणेंची मागणी
…म्हणून गुजरातमध्ये सर्वाधिक ड्रग्ज सापडले
राज्यात गर्भलिंग निदान चाचणीच्या कायद्याची नियमानुसार अंमलबजावणी होतं नाही. महाराष्ट्रासह परराज्यामध्ये गर्भलिंग निदान चाचणीच्या माध्यमातून मुलींऐवजी मुलांना प्राधान्य देण्यात येत असल्यामुळे मुलींची संख्या कमी झाली आहे. परिणामी आगामी पिढीचं भविष्य धोक्यात आहे, असंही मतं आंदोलकांनी व्यक्त केले आहे.