अग्निवीर भरतीपूर्व परीक्षेत धावताना तरुण गतप्राण

गुरुवार, १८ ऑगस्ट रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मैदानावर ही घटना घडली.

अग्निवीर भरतीपूर्व परीक्षेत धावताना तरुण गतप्राण

औरंगाबाद येथे अग्निपथ योजनेअंतर्गत सैन्य भरतीदरम्यान दुर्दैवी घटना घडली आहे. सैन्य भरतीदरम्यान एका तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. गुरुवार, १८ ऑगस्ट रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मैदानावर ही घटना घडली. करण नामदेव पवार (वय २० वर्षे, रा. सिरजापूर-विठ्ठलवाडी, ता. कन्नड, जि. औरंगाबाद) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

करण आणि त्याचा भाऊ सागर पवार (१८) हे दोघे त्यांच्या गावातील इतर मुलांसोबत औरंगाबाद येथे सैन्य भरतीसाठी १७ ऑगस्ट रोजी आले होते. सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मैदानावर अग्निवीर योजनेंतर्गत सैन्य भरती प्रक्रिया सुरू आहे. यावेळी अग्निवीर सैन्य भरतीपूर्व परीक्षेत धावताना करण याचा मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ ऑगस्टच्या रात्री १२ वाजेच्या सुमारास भरती प्रक्रिया सुरू असताना १६०० मीटर धावण्यासाठी काही गट करण्यात आले होते. यावेळी एका गटात करण होता तर दुसऱ्या गटात करण याचा भाऊ सागर होता. त्यानंतर करणने त्याचे तीन राऊंड पूर्ण केले. मात्र, चौथ्या राऊंडला तो चक्कर येऊन मैदानात कोसळला आणि बेशुद्ध झाला. त्यानंतर सैन्य अधिकाऱ्यांनी तत्काळ त्याला घाटी रुग्णालयात दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी करणला मृत घोषित केले.

हे ही वाचा:

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदियांच्या घरावर सीबीआयची छापेमारी

कंबोज यांच्यानंतर आता निंबाळकरांचा ईडीस्फोट

दहीहंडी, गणेशोत्सवादरम्यान दाखल झालेले गुन्हे घेणार मागे

ती बोट इंजिन बंद पडल्याने भरकटली आणि हरिहरेश्वरला आली

करण आणि सागर हे दोघे भाऊ आपल्या आजी-आजोबांसोबत राहत होते. त्यांच्या आईचे २०१४ मध्ये आजारपणामुळे निधन झाले. करण हा गेल्या तीन ते चार वर्षांपासून सैन्य भरतीची तयारी करत होता. मोठा भावाची तयारी पाहून त्याचा लहान भाऊ सागर हाही सैन्यदलात भरती होण्याचे स्वप्न पाहू लागला. दोघे भाऊ मिळून सोबतच सैन्य भरतीची तयार करत होते. दरम्यान, करण पवार याच्यावर गुरुवारी रात्री आठच्या सुमारास चापानेर परिसरातील विठ्ठलवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

Exit mobile version