30 C
Mumbai
Sunday, January 5, 2025
घरविशेषशेतकरी आंदोलनाला हिंसक वळण; एक मृत्यू, १२ पोलिस आणि ५८ शेतकरी जखमी

शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण; एक मृत्यू, १२ पोलिस आणि ५८ शेतकरी जखमी

Google News Follow

Related

पिकांना किमान आधारभूत किंमत मिळावी, याच्या कायदेशीर हमीसाठी गेल्या आठ दिवसांपासून शंभू आणि दातासिंह सीमेवर ठाण मांडलेल्या शेतकऱ्यांनी बुधवारी सकाळी दिल्लीच्या दिशेने कूच करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना रोखण्यासाठी हरियाणा पोलिस आणि निमलष्करी दलाने अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि रबरी गोळ्या झाडल्या. या संघर्षात १२ पोलिस आणि ५८ शेतकरी जखमी झाले आहेत. दातासिंहवाला सीमेवर दोन शेतकरी गोळी लागून जखमी झाले. त्यातील भटिंडा गावातील शुभकरण (२३) याचा मृत्यू झाला. डोक्याला गोळी लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे.

शंभू सीमेवर सहा शेतकरी जखमी झाले आहेत. दुसरीकडे, केंद्रीय कृषी मंत्री अर्जुन मुंडा यांनी शेतकऱ्यांना पुन्हा चर्चेचे निमंत्रण दिले आहे. केंद्राच्या प्रस्तावावर शेतकरीनेत्यांनी दिल्लीला कूच करण्याचा बेत दोन दिवस पुढे ढकलला आहे. शुक्रवारी संध्याकाळी पुढील रणनिती जाहीर केली जाईल, असे शेतकरीनेते सरवणसिंह पंधेर यांनी सांगितले.

हे ही वाचा:

“विरोधकांनी टीका करण्यापेक्षा निर्णय चुकीचा कसा हे दाखवावे”

जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या निवासस्थानी सीबीआयची छापेमारी

दक्षिण चीनमध्ये मालवाहू जहाज पुलावर आदळले, दोघांचा मृत्यू!

भारत-चीन सीमाभागात बर्फात अडकलेल्या ५०० जणांची सुटका

दातासिंहवाला सीमेवर बुधवारी दुपारी एक वाजता आंदोलनाने उग्र रूप धारण केले. पंजाबचे शेतकरी बुलडोझरच्या माध्यमातून सीमेवरील बॅरिकेड हटवण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना अडवले असता त्यांनी भांड्यात मिरची पूड टाकून त्याला आग लावली आणि त्याचा धूर पंख्याच्या मदतीने पोलिसांच्या दिशेने पसरवला. त्यानंतर पोलिसांनाही अश्रुधूर, पाण्याचा मारा आणि लाठीमार करावा लागला. त्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी तलवार आणि काठ्यांनी पोलिसांवर हल्ला केला.

 

अंबालाच्या शंभू सीमेवरही दिवसभर संघर्ष सुरू होता. युवा शेतकऱ्यांनी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत अनेकदा बॅरिकेडिंगच्या जवळ जात ते तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र अश्रुधूर आणि पाण्याच्या माऱ्यामुळे त्यांना माघार घ्यावी लागली. हरियाणाच्या बाजूने ड्रोनच्या माध्यमातून अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. त्यामुळे शेतकरी नेते पंधेर व डल्लेवार यांची प्रकृती बिघडली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा