विरार येथील हार्दिक दयानंद पाटील या ३५ वर्षीय तरुणाने नवा विश्वविक्रम घडवला आहे. जागतिक पातळीवर २० ऑगस्ट रोजी फुल आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण केली. ही स्पर्धा युरोपातील स्वीडनमध्ये पार पडली आहे. हार्दिकने या अगोदर १५ वेळा आयर्न मॅन स्पर्धा पूर्ण केली असून. १५ वेळा स्पर्धा पूर्ण करणारा हार्दिक पाटील हा पहिला भारतीय ठरला आहे. या पठ्ठयाने हे देदीप्यमान यश संपादन करून तो विरारमध्ये परतला आहे.
हार्दिक दयानंद पाटील हा विरारच्या वर्तकवाडीचा रहिवासी असून, विरार येथील विवा महाविद्यालयातून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. तसेच हार्दिकने तीन आठवड्यांत २ तर १० आठवड्यांत ३ फुल आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण केल्या आहेत. तर १२ ऑगस्टला पहिली स्पर्धा अमेरिकेतील डेस मोईनेस येथे ६ ऑगस्टला यूरोपातील इस्टोनिया येथे तर २० ऑगस्ट रोजी युरोपयेथील स्वीडन येथे सपर्धा पूर्ण केली. हार्दिकने आता पर्यंत १५ वेळा फुल आयर्नमॅन तर १८ वेळा हाफ आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण केल्या आहेत.
वसई तालुक्यासह पालघर, ठाणे जिल्ह्यामध्ये आपल्या प्रोफेशनल बॉडी बिल्डिंगच्या माध्यमातून त्याने जुनिअर महाराष्ट्र श्री व सिनियर श्री यामध्ये प्रथम क्रमांक मिळवून नाव कमावले आहे. २०१५ मध्ये पहिल्यांदाच फुल आयर्नमॅनचा किताब पटकावून आपली घोडदौड सुरु केली आहे. हार्दिक पाटील याने चार वेळा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, तसेच चार वेळा वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया आणि तीन वेळा एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले आहे. हार्दिकने आजवर शिकागो, न्यूयॉर्क, टोकियो, बोस्टन, लंडन, न्यूझीलँड, मेक्सिको, डेन्मार्क, तैवान, अमेरिका, ऑस्ट्रेलिया या देशात जावून आपली स्पर्धापूर्ण केली आहे.
हे ही वाचा:
पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त ‘विविधतेत एकता’ उत्सव
महाराष्ट्र काँग्रेसमधील जी-२२ मुळे खोळंबला मंत्रिमंडळाचा विस्तार
मदरशातून देशविरोधी कृत्य झाले तर याद राखा
गर्भवतीचा मृत्यू झाला आणि पोर्तुगालच्या आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा दिला
ही स्पर्धा आर्थिक दृष्ट्या महाग असली तरी, सर्वसामान्य खेळाडूला या स्पर्धेच चॅलेंज स्वीकारणं आर्थिक अडचणीमुळे शक्य होत नाही, पण मी लवकरच भारतासह पालघर जिल्ह्यातील इच्छुक स्पर्धकांना यात सामाहून घेत, स्पर्धेकडे वळवण्याचा प्रयत्न करणार आहे, असे माहिती हार्दिक पाटील या खेळाडू ने दिली.