युवा लेखकांना मिळणार संधी; PM YUVA 3.0 कार्यक्रमाची घोषणा

३० वर्षांखालील लेखकांना मार्गदर्शन आणि त्यांच्या लेखन कौशल्याला प्रोत्साहन देण्याचा उद्देश

युवा लेखकांना मिळणार संधी; PM YUVA 3.0 कार्यक्रमाची घोषणा

शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाने PM-YUVA 3.0 कार्यक्रमाची घोषणा केली आहे. तरुण लेखकांना मार्गदर्शन करण्यासाठी, त्यांच्या लेखन कौशल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा कार्यक्रम असणार आहे. या कार्यक्रमाचे उद्दिष्ट भारतातील वाचन आणि लेखन संस्कृती जोपासणे आणि जागतिक स्तरावर भारतीय साहित्याचा प्रचार करणे असे आहे.

PM-YUVA 3.0 ही योजना भारतातील युवा लेखकांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. ज्यामुळे हे तरुण आपल्या लेखन कौशल्यांद्वारे देशाच्या विकासाचे प्रतिनिधित्व करू शकतील. या योजनेंतर्गत ३० वर्षांखालील लेखकांना मार्गदर्शन देणं आणि त्यांच्या लेखन कौशल्याला प्रोत्साहन देणं हा उद्देश आहे. कार्यक्रमासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १० एप्रिल आहे. या कार्यक्रमाचे पहिले दोन टप्पे यशस्वी झाल्यानंतर हा तिसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे. पहिल्या दोन टप्प्यात २२ भारतीय भाषांमध्ये आणि इंग्रजी लेखन करून युवा लेखकांनी भाग घेतला होता. आता या नवीन टप्प्यातही लेखकांना २२ भारतीय भाषांमध्ये आणि इंग्रजी भाषेत लेखन करता येणार आहे.

राष्ट्र उभारणीत भारतीय समुदायाचे योगदान- आपल्या देशाच्या विकासाला आकार देणाऱ्या परदेशातील भारतीयांच्या प्रेरणादायी कथा, भारतीय ज्ञान प्रणाली- भारताच्या ज्ञानाचा आणि सांस्कृतिक वारशाचा शोध, आधुनिक भारताचे निर्माते (१९५०- २०२५) भारताची व्याख्या करणाऱ्या दूरदर्शींच्या प्रवासाचे वर्णन अशा विषयांवर PM-YUVA 3.0 मध्ये लेखकांना लेखन करायचे आहे.

या कार्यक्रमाच्या अंतर्गत लेखकांची निवड ‘ऑल इंडिया कॉन्टेस्ट’ द्वारे केली जाईल. ही कॉन्टेस्ट ११ मार्च ते १० एप्रिल २०२५ या कालावधीत mygov.in वर आयोजित केली आहे. निवडलेले लेखकांची यादी मे किंवा जून २०२५ मध्ये जाहीर केली जाईल आणि प्रस्तावांचे मूल्यांकन एप्रिल २०२५ मध्ये केलं जाईल. सुस्पष्ट मूल्यांकन निकषावर आधारित ५० तरुण लेखकांची निवड केली जाते. नॅशनल बुक ट्रस्ट (एनबीटी) निवड समिती स्थापन करेल. अर्जदारांना १०,००० शब्दांचा पुस्तक प्रस्ताव सादर करावा लागतो, ज्याचे नंतर एका पॅनेलद्वारे पुनरावलोकन केले जाते. अंतिम निवडीपूर्वी निवडलेल्या उमेदवारांना बहु- टप्प्यांत निवड प्रक्रिया पार पाडावी लागते.

हे ही वाचा : 

जितक्या मंदिरांचे पुरावे सापडतील तितक्या मंदिरांचे पुनरुज्जीवन करणार

संभल हिंसाचारात सहभागाच्या आरोपाखाली सपा खासदार झियाउर रहमान बर्क यांना नोटीस

अमेरिकन निवडणुकांमध्ये बदल करण्यासाठी ट्रम्प यांची कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी; भारताचे का दिले उदाहरण?

छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या घरावर सीबीआयकडून छापेमारी

निवडलेल्या लेखकांना सहा महिन्यांचा मार्गदर्शन कार्यक्रम दिला जातो. यादरम्यान, लेखक कार्यशाळा होतात, मार्गदर्शकांशी संवाद साधण्याची संधी मिळते आणि भारताच्या साहित्यिक परिसंस्थेशी परिचित केले जाते. निवडलेल्या लेखकांना सहा महिन्यांसाठी दरमहा ५०,००० रुपयांची आर्थिक मदत मिळते. त्यांची कामे नॅशनल बुक ट्रस्ट (एनबीटी) द्वारे अनेक भाषांमध्ये प्रकाशित आणि प्रमोट केले जाते. निवडक लेखकांना साहित्य महोत्सव आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर त्यांचे काम सादर करण्याची संधी मिळते.

कोरटकर सापडला बातमी मात्र फरार ! | Mahesh Vichare | Prashant Koratkar | Indrajit Sawant |

Exit mobile version