पुण्यात सलूनमध्ये तरुणीचे धर्मांतर; चालकाला चोप!

भाजपाच्या कार्यकर्त्यांनी केली कारवाई

पुण्यात सलूनमध्ये तरुणीचे धर्मांतर; चालकाला चोप!

लव्ह जिहाद आणि हिंदू तरुणीचं धर्मांतर केल्याच्या आरोपावरून पुण्यामध्ये एका सलून चालकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. भाजपाच्या महिला मोर्च्याच्या उज्ज्वला गौड यांच्या कार्यकर्त्यांनी सलून चालकाला चोप दिला. सलूनमध्ये कामाला असलेल्या हिंदू तरुणीचे जबरदस्तीने धर्मांतर केल्याचा त्यांच्यावर आरोप केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सलून चालक आणि काम करणाऱ्या तरुणीमध्ये वाद झाल्यानंतर ही घटना घडली.

पुण्याच्या कोथरूड भागात ही घटना घडली. सलून चालकाला मारहाण केल्याचे व्हिडीओ देखील समोर आले आहेत. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरु आहे. अर्श (ARSH) असे या सलूनचे नाव आहे. इथून पुढे हे सलून आता चालू देणार नाही, याठिकाणी आता कोणी येवू नये, सलून बंद झाले आहे, असे उज्ज्वला गौड यांनी म्हटले. यावेळी त्यांनी सलूनमध्ये शिरकाव करत सलूनच्या पाटीला काळे फासले.

भाजपाच्या महिला मोर्च्याच्या उज्ज्वला गौड यांनी दावा केला की, या सलूनमध्ये हिंदू तरुणीला ब्लॅकमेल करून तिच्याकडून कलमा वाचून घेतला. कलमाचे वाचन केलेले बाहेर कोणाला सांगू नये म्हणून तिला एक लाख रुपयांची लाच देण्यात आली. पंरतु, तिने ते पैसे घेण्यास नकार दिल्याने तिला मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. जावेद नावाच्या व्यक्तीचे या सलूनसोबत करार आहे, त्याने ते तात्काळ बंद करून जेथून आलाय तेथे निघून जावे, असे इशारा गौड यांनी दिला.

हे ही वाचा : 

श्रेयस अय्यर – मार्च महिन्याचा खरा सुपरस्टार

“‘बस नाम ही काफी है’ – पण प्रदर्शन कुठं आहे, मुंबई?”

जुंदालने न उलगडलेले लोकल कनेक्शनचे गूढ राणा उलगडेल?

कर्नल सूर्यप्रताप वक्फ विधेयकाचे समर्थन करत होते, ड्रायव्हर वसीमला आला राग आणि…

दरम्यान, या प्रकरणी तपास केला असता असे कोणतेही कृत्य घडले नसल्याचा जबाब तरुणीने दिला आणि तिला प्रेशराइज करत असल्याचे म्हटले. एकमेकांसोबत काम करताना भांडण झाल्याचे तिने कबूल केले. पण भाजप पदाधिकाऱ्यांचे असे म्हणणे आहे की तिचे सलून मध्येच लग्न लावण्यात आले. जबाबात तरुणीने अजून याची पुष्टी केलेली नाही. पोलिसांनाही या प्रकारात असे काहीही सापडले नसल्याने भारतीय न्याय संहिता कलम ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.

जुंदालने न उलगडलेले लोकल कनेक्शनचे गूढ राणा उलगडेल? | Dinesh Kanji | Tahawwur Rana | Abu Jundal |

Exit mobile version