23 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषराष्ट्रवादी नेत्यावर बलात्काराचा आरोप करणारी तरुणी नॉट रिचेबल!

राष्ट्रवादी नेत्यावर बलात्काराचा आरोप करणारी तरुणी नॉट रिचेबल!

Google News Follow

Related

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख याच्या विरोधात बलात्काराची तक्रार देणारी तरुणी बेपत्ता झाली आहे. या तरुणीशी संपर्क करायचा प्रयत्न पोलीस यंत्रणे कडून केला जात आहे. परंतू औरंगाबादची रहिवासी असणाऱ्या या तरुणीशी कुठल्याच प्रकारचा संपर्क होत नसल्याची माहिती मिळत आहे.

अल्पसंख्यांक समाजची ही तरुणी औरंगाबादमध्ये शिकवण्या घेऊन आपला निर्वाह करत होती. शेख यांनी या तरुणीला नोकरीचे आमिष दाखवले. १० नोव्हेंबर रोजी शेख यांनी तरुणीला भेटण्यासाठी बोलावले. त्यानंतर १४ नोव्हेंबरला भेटण्याच्या उद्देशाने गाडीत बसवत तिला निर्जन ठिकाणी घेऊन जात बलात्कार केला असे तरुणीच्या तक्रारीत म्हटले आहे.

मेहबूब शेख याने मात्र हे सर्व आरोप फेटाळले आहेत. गुन्हा दाखल झाल्या नंतर शेख याने पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला आहे. “तक्रारदार तरुणीला मी कधीही भेटलो नाही किंवा फोनवरही बोललो नाही.” असे शेख याचे म्हणणे आहे. नोव्हेंबर महिन्याच्या १०- ११ तारखेला आपण मुंबईत तर १४ तारखेला बीड जिल्ह्यातील शिरूर कासार गावाकडे असल्याचा दावा शेख याने केला आहे. “पोलिसांना सर्व पुरावे आणि आवश्यक माहिती देण्यास मी तयार आहे. गरज पडल्यास माझी नार्कोटेस्ट करा. दोषी आढळलो तर फासावर जायचीही माझी तयारी आहे” असे शेख याने म्हटले आहे.

भाजयुमोचे राज्यव्यापी आंदोलन

मेहबूबच्या अटकेसाठी भारतीय जनता युवा मोर्चा आक्रमक झाला. त्यांनी राज्यात विविध ठिकाणी मेहबूबच्या अटकेसाठी तीव्र आंदोलन छेडले. मुंबई, नागपूर, औरंगाबाद, नवी मुंबई सह अनेक महत्वाच्या शहरात भाजयुमोचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा