कोरोनाच्या महामारीत लाखो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. यात प्रत्येक वयोगटाच्या लोकांचा समावेश आहे. यात वयोवृद्ध व्यक्तींपासून तरुणांपर्यंत अनेकांनी या जगाचा निरोप घेतला. असाच एक तरुण म्हणजे ऋग्वेद कुलकर्णी. १ मे रोजी सकाळी ऋग्वेदचे लातूर येथील रुग्णालयात निधन झाले.
देशात सध्या कोरोनाची लाट सुरु असताना महाराष्ट्रात त्याचा त्सुनामी आलाय. या त्सुनामीच्या विळख्यात अनेक जण येत आहेत. अठ्ठावीस वर्षीय ऋग्वेद असाच कोरोनाच्या विळख्यात आला. ऋग्वेद हा शिक्षणाने वकील होता. लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारांमध्ये त्याची जडणघडण झाली. पुढे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या विद्यार्थी चळवळीशी पण तो संलग्न होता. लातूर सारख्या शहरातुन येणारा ऋग्वेद मुंबईत येऊन आपले आयुष्य घडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत होता. अतिशय लहान वयातच आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंधित टीममध्ये तो काम करत होता.
हे ही वाचा:
सुनील मानेला वाटते आहे तुरुंगाची भीती
भारत आयात करणार रेमडेसिवीरचे डोसेस
काही दिवसांपूर्वीच त्याला कोरोनाने ग्रासले. लातूर येथील रुग्णालयात तो उपचार घेत होता. पण त्याची तब्येत खालावली आणि त्याचे अकाली निधन झाले. ऋग्वेदच्या निधनाबद्दल समाजमाध्यमांवर महाराष्ट्रभरातून शोक व्यक्त केला जात आहे.