27 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरविशेषशी शी !! नशेसाठी चक्क कंडाेम उकळतात, त्याचे पाणी पितात!

शी शी !! नशेसाठी चक्क कंडाेम उकळतात, त्याचे पाणी पितात!

Google News Follow

Related

मद्य, भांग, गांजा, चरस, काेकेन, एलसीडी अगदी नव्याने आलेले डिजिटल ड्रग असे नशेचे वेगवेगळे प्रकार बाजारात मुबलक प्रकार आहे. तरीही नशेबाजांसाठी नवनवीन पर्यायांचा शाेध लागतच असताे. आता तर काय नशा करण्यासाठी तरुणमंडळी चक्क कंडाेमचा वापर करीत असल्याचे धक्कादायक वास्तव समाेर आले आहे. नशेच्या या वेगळ्याच प्रकारामुळे तपास यंत्रणादेखील सध्या संभ्रमात पडल्या आहेत. कारण फ्लेवर्ड कंडाेमची मागणी अचानक वाढली असून दुकानांमध्ये त्याचा तुटवडाही जाणवत असल्याचे चित्र आहे.

कंडाेमची नशा पश्चिम बंगालच्या दुर्गापूर परिसरातील तरुण करत असल्याचे दिसून आले आहे. कारण येथील दुर्गापुर परिसरातील दुर्गापुर सिटी सेंटर, विधान नगर बनाचिती आणि दिपा या भागात फ्लेवर्ड कंडाेमची मागणी वाढत असल्याचे दिसून आले. ही अचानक मागणी कशी वाढली हा दुकानदारांसाठीही अनाकलनीय विषय ठरला आहे. परंतु आता या वाढलेल्या कंडाेम विक्री मागील कारणे हळूहळू उघडकीस येऊ लागली आहे. त्यामुळे सध्यातरी प. बंगालच्या दुर्गापूर व परिसरात नशेसाठीचा हा ट्रेंड जोरात असून तो इतर भागात पसरू नये यासाठी यंत्रणा पूर्णतः कामाला लागल्या आहेत. या तरुणांचे समुपदेशन करण्यासह असे करण्याचे दुष्परिणामही सांगण्यात येत आहेत.

हे ही वाचा:

ऑगस्ट महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद!

मविआ सरकारच्या काळात अघोषित आणीबाणी होती!

अग्निपथमध्ये नौदल प्रवेशासाठी महिलांची पसंती

दोन वर्षात मुंबई खड्डेमुक्त करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली ग्वाही

वाफ घेण्यासह उकळून पाणी

नशेखोर तरुण कंडोमचा वापर वाफ घेण्यासाठी, तसेच पाण्यात उकळून ते पाणी पिण्यासाठी करीत असल्याची धक्कादायक माहिती समाेर आली आहे . हे नशा करणारे तरुण अशाच कंडोम उकळून, त्याची वाफ घेत असल्याची किंवा ते पाण्यात उकळून ते पाणी पिण्यासाठी वापर करत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे .

संशाेधन काय सांगते

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या संशोधनानुसार कंडोममध्ये एरोमेटिक कम्पाऊंड असतात. हे कम्पाऊंड विरघळल्यानंतर त्याचे रुपांतर अल्कोहोलमध्ये होते. कंडोमला बराच काळ पाण्यात उकळत ठेवले तर त्याच्यातील अल्कोहोल असणारे द्रव्य पाण्यात मिसळते.

विशिष्ट सुगंधाचा वापर नशेसाठी

तज्ज्ञांच्या मते, कंडोममध्ये विशिष्ट प्रकारचा सुगंध असतो. त्याचा वापर नशेखोर नशेसाठी करतात. कंडोम उकळत्या पाण्यात काही काळ ठेवल्यानंतर त्यातील सुगंध पाण्यात मिसळतो. मग त्या पाण्याची वाफ घेतल्यास किंवा ते पाणी पिल्यास त्यामुळे नशा येते,.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा