रेल्वे टीसीने पकडलेला तरुण म्हणतो, जगायचं कसं?

रेल्वे टीसीने पकडलेला तरुण म्हणतो, जगायचं कसं?

एकीकडे कोरोनामुळे नोकऱ्या गमावलेले अनेक तरुण निराश झालेले आहेत. त्यात काहींना नोकरी लागली, पण लोकल रेल्वेने प्रवास करणे शक्य नाही. मात्र परिस्थितीमुळे रेल्वेने प्रवास केला तर दंड भरण्याची वेळही येते. अशाच एका तरुणाने आपला व्हीडिओ शेअर करत आपली व्यथा मांडली आहे. त्याने दंडाची रक्कम तर भरली. मात्र आता खूप झाले लोकल रेल्वे सगळ्यांसाठी खुली करावी, लॉकडाऊनमध्ये जगायचं कसं अशी मागणी त्याने केली आहे.

त्यावर भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे की, आता डेल्टा विषाणूचा बागुलबुवा उभा करून हातावर पोट असणाऱ्या गरीब जनतेला रेल्वेत प्रवेश रोखण्याचा करंटेपणा राज्य सरकारने करू नये, अशी व्यथा रेल्वे प्रवासात पकडले गेलेल्या तरुणाने मांडली आहे. त्याचा व्हीडिओ अंतर्मुख करायला लावणारा आहे.

हे ही वाचा:

इम्पेरिकल डाटा हा राज्य सरकारचा विषय

मी ओबीसी असल्यामुळे मला महसूल खातं मिळालं नाही

संजय राऊत खातात शिवसेनेचं पण जागतात पवारांच्या निष्ठेला

केंद्र सरकार खरेदी करणार १३५ कोटी लसी

या व्हीडिओत आपली व्यथा मांडणारा तरुण परळ स्टेशनला उतरला आणि तेवढ्यात त्याला तिकिट तपासनीसाने पकडले. तेव्हा व्हीडिओ बनवून त्याने आपली व्यथा मांडली. टीसीची यात कोणतीही चूक नाही, असे सांगत तो म्हणतो की, रोज जे कमवत आहेत, त्यांना रेल्वेने जाण्याशिवाय मार्गही नाही. त्यांनी काय करावे. मी स्वतः वर्षभरापासून नोकरीशिवाय होतो. आता नोकरी मिळाली, पण रेल्वेने प्रवास करणे शक्य नसले तरी जावे लागले. दंडाचे पैसे भरण्याची तयारी मी दाखवली आहे. पण आता सगळ्यांना रेल्वे प्रवास खुला करावा. इतर लोकही गर्दी करून रेल्वेने येत आहेत. त्यामुळे खूप झाले, लॉकडाऊन. जगणार कसे लोक?

Exit mobile version