25 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरविशेषयू ट्युब स्टार MrBeast ने कमावले गेल्या वर्षी सर्वाधिक मानधन

यू ट्युब स्टार MrBeast ने कमावले गेल्या वर्षी सर्वाधिक मानधन

Google News Follow

Related

Mr Beast नावाने ओळखल्या जाणाऱ्या यू ट्युब स्टारने २०२१ मधला यूट्युबचा सर्वाधिक कमाई करणारा स्टंट निर्माता ठरला आहे.

MrBeast याचे खरे नाव जिमी डोनाल्डसन (२३) आहे. त्याचे युट्युबवर ८८ दशलक्षाहून अधिक सदस्य आहेत. तो विस्मयकारक स्टंट दर्शविणारे व्हिडिओंसाठी लोकप्रिय आहेत. फोर्ब्सच्या यादीनुसार, गतवर्षी त्याची कमाई ५४ दशलक्ष डॉलर ५ कोटी ४० लाख डॉलर झाली आहे.

त्याच्या व्हिडिओंमध्ये “परोपकार म्हणून मनोरंजन” वापरणे ही मुख्य थीम आहे. त्याच्या धर्मादाय उपक्रम #TeamSeas साठी, डोनाल्डसनने सहकारी युट्युब मार्क रॉबरसोबत एकत्र येऊन जगातील जलस्रोतांमधील कचरा साफ करण्यासाठी तीस मिलियन डॉलर जमा केले आहेत.

२०२१ मध्ये, डोनाल्डसनने सलग दुसऱ्या वर्षी युट्युबचा Steamy Awards Creator of the Year जिंकला आहे. त्याच्या व्हिडिओंना तब्बल १० अब्ज व्ह्यूज असतात. आणि त्याच्या एकत्रित युट्युब चॅनेलवर त्याचे दीडशे दशलक्षाहून अधिक सदस्य आहेत, ज्यात MrBeast गेमिंग, Beast Reacts आणि Beast Philanthropy यांचा समावेश आहे.

या सोशल मीडिया स्टारने MrBeast बर्गर, अँप आधारित जेवण ऑर्डरिंग सेवा आणि इंटरएक्टिव्ह गेम्स कंपनी देखील लॉन्च केली आहे.

हे ही वाचा:

दिल्लीत गेल्या दोन वर्षातील सर्वाधिक हुडहुडी भरविणारा दिवस

संगीतद्वेष्ट्या तालिबान्यांनी भरचौकात जाळली वाद्ये!

मॉलमध्ये पार्किंग शुल्क आकारणे बेकायदेशीर…

सुनील गावस्कर म्हणतात, ऋषभ पंत कसोटी कर्णधार म्हणून योग्य!

 

वयाच्या १३ व्या वर्षी त्याने पहिला यूट्युब व्हिडिओ पोस्ट केला होता. त्याचे सुरुवातीचे व्हिडिओ गेम प्लेथ्रूवर केंद्रित करणारे होते. पाच वर्षे झाल्यावर २०१७ मध्ये त्याचा पहिला व्हायरल व्हिडिओ झाला. त्या व्हिडीओमध्ये तो एक लाखापर्यंत मोजताना दाखवले आहे. हे कार्य पूर्ण करण्यासाठी त्याला ४० तासांपेक्षा जास्त वेळ लागला होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा