‘मला किंग म्हणून हाक मारू नका. त्यामुळे मला खूप अवघडल्यासारखे वाटते,’असे आवाहन क्रिकेटपटू विराट कोहली याने त्याच्या तमाम चाहत्यांना केले आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या एका कार्यक्रमादरम्यान तो बोलत होता.
विराट कोहली याला गेल्या अनेक वर्षांपासून ‘किंग’ म्हणून संबोधले जाते. अनेक प्रसारमाध्यमे आणि प्रसारण वाहिन्यांनी त्याला हे नाव दिले होते. जर सचिन तेंडुलकर जसा ‘देव’ आहे तर, कोहली हा चाहत्यांचा ‘किंग’ झाला आहे. मात्र आता इतक्या वर्षांनंतर स्वतः विराटला हा ‘टॅग’ नको आहे. त्याला यामुळे अवघडल्यासारखे होते, असे त्याने सांगतिले.
चिन्नास्वामी स्टेडिअमवर झालेल्या कार्यक्रमात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचे बेंगळुरू असे नाव झाल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी संघाच्या नव्या जर्सीचे अनावरणही झाले. तेव्हा त्याने बेंगळुरू संघाचा कर्णधार म्हणून परतल्याबाबत आनंद व्यक्त केला. निवेदक दानिश सैत याने ‘किंग म्हणून कसे वाटते आहे,’ असा प्रश्न विराटला विचारला. तेव्हा गर्दीने एकच जल्लोष केला. त्यामुळे विराटला काही क्षण बोलताच आले नाही. त्यानंतर मात्र त्याने जमावाला शांत राहण्यास सांगितले. ‘तुम्ही मला हे (किंग) संबोधणे थांबवले पाहिजे. तुम्ही मला प्रत्येक वर्षी जेव्हा या नावाने हाक मारता, तेव्हा मला खूप अवघडल्यासारखे वाटते. तुम्ही मला विराट म्हणा,’ असे आवाहन विराटने केले.
अनेक वर्षांपूर्वी सचिन तेंडुलकरनेही त्याला देव म्हणू नका, असे म्हटले होते. मात्र ११ वर्षांपूर्वी तो क्रिकेटमधून निवृत्त होऊनही त्याला क्रिकेटचा देव म्हणून संबोधले जाते. त्याचप्रमाणे आता विराट कोहली याला चाहत्यांकडून प्रेमाने ‘किंग’ म्हणून हाक मारली जाते.
हे ही वाचा:
मजुरांच्या कुटुंबीयांना जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या रफिकचा हिंदूद्वेष जुनाच!
सिद्दीक कप्पननेच कपिल मिश्रा, परवेश वर्मा यांना मारण्यासाठी पीएफआय हिट पथकाला निर्देश दिले
आयपीएलच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये ‘ठोको ताली’
बंद दाराआड चर्चा: भाजपाने जुळवले शिवसेना + ठाकरे समीकरण?
पहिल्यांदा ‘किंग’ म्हणून कोणी संबोधले?
ऑस्ट्रेलियात राहणारा भारतीय क्रिकेटचा चाहता कुणाल गांधी यांनी केलेल्या दाव्यानुसार, त्यांनी कोहलीचे वर्णन करताना पहिल्यांदा ‘किंग’ हा शब्द वापरला होता. ‘सन २०१४च्या भारताचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आला होता. त्यावेळी मला विराटला एक जर्सी भेट द्यायची होती. परंतु मला केवळ त्याचे नाव त्यावर लिहायचे नव्हते. त्यासाठी चांगले असे विशेषणही द्यायचे होते. तेव्हा तो चांगल्याच फॉर्ममध्ये होता आणि माझ्या मनात अचानक किंग हा शब्द चमकून केला.
मी जर्सीवर किंग कोहली असे लिहून त्याला ते दिले. त्याने त्या जर्सीवर स्वाक्षरी केली आणि क्रिकेटप्रेमी त्याला किंग कोहली म्हणून हाक मारू लागले,’ असे त्याने डेली ऑब्झर्व्हर या दैनिकाला सांगितले. ‘बॉर्डर-गावस्कर चषकासाठी भारताचा संघ सन २०१८मध्ये ऑस्ट्रेलियाला आला असता, मी विराटला ‘किंग कोहली’ जर्सीची आठवण करून दिली होती, तेव्हा त्याने आभार मानले होते. त्याने माझ्या मुलाला कठोर मेहनत घेण्याचा सल्ला देऊन क्रिकेटर होण्याच्या शुभेच्छा दिल्या होत्या,’ अशी आठवण त्यांनी काढली.