अन्सारीच्या मृत्यूनंतर तुरुंग अधीक्षकाला जीवे मारण्याची धमकी!

अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

अन्सारीच्या मृत्यूनंतर तुरुंग अधीक्षकाला जीवे मारण्याची धमकी!

कुख्यात गुंड व राजकारणी मुख्तार अन्सारी याचा कैदेत असताना मृत्यू झाल्यानंतर बांदा तुरुंगाचे अधीक्षक वीरेश राज शर्मा यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने एका मोबाइल नंबरवरून ठार मारण्याची धमकी दिली. केवळ १४ सेकंद हा कॉल चालला. तुरुंग अधीक्षकांनी या प्रकरणी नगर कोतवाली येथील अज्ञात माणसाविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कॉलच्या रेकॉर्डिंगसह त्याची पडताळणी सुरू करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वीच न्यायालयीन समिती अन्सारी याच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी तुरुंगात पोहोचले होते. मुख्तार अन्सारी याच्यावर तुरुंगातच विषप्रयोग केला जात होता, असा आरोप केला जात आहे. तुरुंग अधीक्षकांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत.

हे ही वाचा:

१४ फुट लांबीची कोठडी, एक टीव्ही आणि तीन पुस्तके!

माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काश्मीरमध्ये ३७० कलम लावून घोडचूक केली!

दिशाभूल करणाऱ्या जाहिरात प्रकरणी रामदेव बाबांनी न्यायालयात हजर होऊन मागितली माफी

अनियमित व्यवहार, नियमभंगामुळे काँग्रेसला साडेतीन हजार कोटींचा कर

मुख्तार याने रोजे सोडल्यानंतर जेवण केले आणि नंतर अचानक त्याच्या पोटात दुखू लागले. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेले असता, हृदयविकाराचा झटका येऊन त्याचा मृत्यू झाला. मात्र दररोज त्याला जेवणातून विषप्रयोग केला जात होता, असा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. या आरोपाची दखल घेऊन या मृत्यूची चौकशी करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार, त्याच्या मृत्यूचा तपास केला जात आहे. मात्र तत्पूर्वीच तुरुंग अधीक्षकांना अशी धमकी आली आहे. ०१३५ असा कोडने हा फोन आला असल्यामुळे त्याचा माग काढण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

अन्सारीच्या दफनविधीला हजारोंची गर्दी
मुख्तार अन्सारीचे दफन ३० मार्च रोजी करण्यात आले. त्यावेळी अनेक जण ‘मुख्तार अन्सारी जिंदाबाद’च्या घोषणा देत होते. दफनभूमीवर जाण्यासाठी लावण्यात आलेले बॅरिकेड्सही या समर्थकांनी तोडले.

Exit mobile version