24 C
Mumbai
Sunday, December 29, 2024
घरविशेष...तर कोविशिल्डचा एकच डोस पुरे!!

…तर कोविशिल्डचा एकच डोस पुरे!!

Google News Follow

Related

देशामध्ये केंद्राकडून मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिम राबवली जात आहे. सध्या कोविडवर तो एक महत्त्वाचा उपाय ठरत असल्याचे समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर आयसीएमआरच्या संशोधनातून काही नवे निष्कर्ष समोर आले आहेत. या संशोधनानुसार ज्यांना पूर्वी कोविड होऊन गेला असेल, अशा लोकांना कोविशिल्ड लसीच्या दुसऱ्या मात्रेची गरज नसल्याचे समोर आले आहे.

लसीकरणामुळे त्या विशिष्ट आजाराविरोधात लढण्यासाठी आवश्यक ती प्रतिपिंडे शरीरात तयार होतात. त्यामुळे आपल्या शरिरात त्या आजाराविरोधातील प्रतिकारशक्ती तयार होते.

हे ही वाचा:

धडधाकट झाडांवर पालिकेची कुऱ्हाड

मॅकॅफी अँटीव्हायरसचे संस्थापक जॉन मॅकॅफी आढळले मृतावस्थेत

नवी मुंबई विमानतळ, भूमिपुत्रांचे घेराव आंदोलन सुरु

बापरे! मोबाईल चोरामुळे इसम गंभीर जखमी

कोविडच्या लसीवर झालेल्या संशोधनानुसार ज्यांना पूर्वी कोविड होऊन गेला असेल अशा रुग्णांच्या शरिरात अशी प्रतिपिंडे आधीपासूनच असतात. लसीचा पहिला डोस दिल्यानंतर त्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होते, परंतु दुसऱ्या डोस नंतर होणारी वाढ फार नसल्याचे लक्षात आले आहे. आयसीएमआर (ईशान्य) आणि आसाम मेडिकल कॉलेज, दिब्रुगढ यांनी संयुक्तपणे केलेल्या संशोधनातून ही बाब समोर आली आहे.

कोविशिल्ड लसीची केवळ एक मात्रा SARS-CoV2 अर्थात कोविडची लागण होऊन गेलेल्या रुग्णांमध्ये पुरेशी ठरू शकते. त्यामुळे देखील पुरेशी प्रतिकारक्षमता निर्माण होऊ शकते. अशा प्रकारातून होणाऱ्या लसीकरणाचा भारतातील तिसरी लाट रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो असे मत या तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा