वाघाला दत्तक घ्या ३ लाखात!

वाघाला दत्तक घ्या ३ लाखात!

वन्य प्राण्यांचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने विविध योजना राबविल्या जात असतात. आता मुंबईतल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली येथील वन्य प्राण्यांसाठी अशीच एक योजना तयार करण्यात आली आहे. वाघ, सिंह, बिबट्या, नीलगाय, चितळ अशा प्राण्यांसाठी ही योजना असेल.

२९ जुलै हा दिवस जागतिक व्याघ्रदिन म्हणून जगभर ओळखला जातो. त्यानिमित्त या दत्तक योजनेला महत्त्व असेल.

बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील प्राणी आता दत्तक घेता येणार आहेत. सिंह, वाघ, बिबट्या, नीलगाय, चितळ, वाघाटी अशा अनेक बंदिस्त वन्य प्राण्यांची देखभाल इथे केली जाते. या प्राण्यांना आता दत्तक घेता येणार आहे. त्यातील वाघाला दत्तक घेण्यासाठी ३ लाख १० हजार रुपये द्यावे लागतील तर सिंहासाठी ३ लाख इतकी रक्कम दत्तक घेणाऱ्याने भरायची आहे. उद्यानातील बंदिस्त वन्य प्राण्यांना दत्तक घेऊन वन्यजीव संवर्धनाच्या कार्यामध्ये सर्वसामान्यांना सहभागी होता येणार आहे. ही दत्तक रक्कम एका वर्षांसाठी असेल.

हे ही वाचा:

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंनी केलं शंभरीत पदार्पण

सरकारच्या आदेशानेच फोन टॅपिंग केलं

भारताला हरवत श्रीलंकेने साधली टी-२० मालिकेत बरोबर

सापाशी खेळता खेळता तरुणाचा खेळ खल्लास

वन्यजीव प्रेमी, संस्था आणि कंपनी यांनी प्राण्यांना १ वर्षाकरीता दत्तक घेऊन वन्यजीव व्यवस्थापनात सहभागी व्हावे असे आवाहन वनसंरक्षक व संचालक संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जी. मल्लिकार्जुन यांनी केले आहे. प्रत्येक प्राण्यासाठी असलेली दत्तक रक्कम अशी-

वाघ : ३ लाख १० हजार रु.
सिंह : ३ लाख रु.
बिबटा : १ लाख २० हजार
रानमांजर : ५० हजार रु.
नीलगाय : ३० हजार रु.
चितळ रुपये : २० हजार रु.
भेकर रुपये : १० हजार रु.

अधिक माहिती आणि अर्ज करण्याकरीता इच्छुकांनी वन संरक्षक व संचालक संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरीवली (पूर्व) मुंबई २. अधिक्षक, सिंह विहार, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरीवली (पूर्व), मुंबई येथे संपर्क साधावा.

Exit mobile version