योगी आदित्यनाथ यांच्या भेटीमुळे मविआ नेत्यांची पोटदुखी वाढली

उत्तर प्रदेशात फिल्म सिटी उभारण्याच्या उद्देशाने घेतली भेट

योगी आदित्यनाथ यांच्या भेटीमुळे मविआ नेत्यांची पोटदुखी वाढली

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई भेटीची पोटदुखी महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये पाहायला मिळते आहे.

योगी आदित्यनाथ हे दोन वर्षांपूर्वी मुंबईत आले होते. नोएडामध्ये फिल्म सिटी बनविण्याची त्यांची योजना आहे. त्यानिमित्ताने ते आले होते. तशीच भेट त्यांनी आताही दिली. त्यावेळी त्यांनी बॉलीवूडमधील कलाकारांची भेट घेतली. त्यात अक्षय कुमारचाही समावेश होता.

यावर काँग्रेसने भाजपावर टीका केली आहे. फिल्म सिटी उत्तर प्रदेशात नेण्याची योजना असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. दोन वर्षांपूर्वी मुंबईत आलेले असताना योगींवर शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी टीका केली होती. मुंबईतून बॉलीवूड नेता येणार नाही, असे ते म्हणाले होते. पण यावेळी त्यांचा सूर थोडा नरमला. अशी फिल्म सिटी कुणाला कुठे नेता येणार नाही. अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित यासारखी मंडळी नोएडात जाऊन राहणार का? बॉलीवूड म्हणजे काही खिशात नेता येण्यासारखी वस्तू नाही.

या भेटीनिमित्ताने योगी आदित्यनाथ हे रोड शो करणार असल्याचे वृत्त चर्चेत आहे. त्यावर संजय राऊत म्हणाले की, त्यांनी मुंबईची मदत जरूर घ्यावी पण रोड शो करण्याचे काय कारण आहे.

हे ही वाचा:

काँग्रेसला भगव्या रंगाचा इतका तिरस्कार का?

खिलाडी अक्षय कुमारने योगी आदिनाथांना दिले रामसेतु पाहण्याचे निमंत्रण

अजित पवार यांची वैचारिक उंची कळली

श्रीनगरमधील अहमद अहंगर दहशतवादी घोषित

राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली होती की, आदित्यनाथ मुंबईत आले काय आणि आले नाहीत काय काहीही फरक पडत नाही. मुंबईची शानच वेगळी आहे. गोरखपूरला मुंबई होण्यासाठी अनेक वर्षे लागतील. मुंबईत जे वातावरण आहे ते वातावरण त्यांच्याकडे कुठून येणार?

काँग्रेसचे माजी खासदार हुसेन दलवाई यांनी तर आदित्यनाथ यांनी भगव्या कपड्यात फिरण्यापेक्षा आधुनिक व्हायला हवे, अशी भूमिका घेतली आहे. बॉलीवूड वगैरे उद्योग आधुनिक आहेत. आधुनिक विचार घ्या. त्यावर भाजपा नेते राम कदम म्हणाले की, काँग्रेसला भगव्या रंगाचा इतका तिरस्कार का? हा रंग त्यागाचे, पवित्रतेचे प्रतीक आहे. काँग्रेस नेत्यांचे असे विधान हे साधूसंतांच्या वस्त्रांचा अपमान करणारे आहे. काँग्रेसचा हिंदूविरोधी चेहरा यामुळे समोर आला आहे.  

Exit mobile version