देशभरात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक सेलिब्रेटी, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे पाहायला मिळत आहे. आता त्यात उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नावाचाही समावेश झाला आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्वीट करत याबाबतची माहिती दिली.
प्रदेश सरकार की सभी गतिविधियां सामान्य रूप से संचालित हो रही हैं।
इस बीच जो लोग भी मेरे संपर्क में आएं हैं वह अपनी जांच अवश्य करा लें और एहतियात बरतें।
— Yogi Adityanath (@myogiadityanath) April 14, 2021
मला काही दिवसांपासून कोरोनाचे लक्षण दिसत होती. त्यानंतर मी चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर मी विलीगकरणात आहेत. तसेच डॉक्टरांनी दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करत आहे. तसेच माझी सर्व काम ऑनलाईन करत आहेत. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन योगी आदित्यनाथ यांनी केले आहे.
योगी आदित्यनाथ यांनी मंगळवार (१३ एप्रिल) पासून आयसोलेट झाले होते. तेव्हापासूनच ते सर्व कामकाज ऑनलाईन किंवा व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून करत होते. तसेच कोरोनाचा आढावा घेण्यासाठी होणाऱ्या बैठकीला त्यांनी ऑनलाईन संबोधित केले होते.
हे ही वाचा:
अजित पवारांनी तेरा साखर कारखाने घशात घातले
अनिल देशमुखांची आज सीबीआय चौकशी
लस उत्सवात लसीकरणाचा नवा विक्रम, लसीकरण किती झाले? वाचा सविस्तर
आणखी काही मंत्र्यांचं बिंग फुटणार आहे. त्यांनाही राजीनामे द्यावे लागतील- मनोज कोटक
दरम्यान काही दिवसांपूर्वी त्यांच्या कार्यालयातील एक अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आला होता. योगी आदित्यनाथ त्यांच्या संपर्कात आले होते. त्यामुळे त्यांनी स्वत:ला विलग करुन घेतले होते. यानंतर त्यांना लक्षण जाणवू लागल्याने त्यांनी कोरोनाची चाचणी केली होती. ही चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.