योगी आदित्यनाथ लोकप्रियतेत दुसऱ्या स्थानावर!

योगी आदित्यनाथ लोकप्रियतेत दुसऱ्या स्थानावर!

इंडिया टुडेने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणानुसार ओडिशाचे नवीन पटनायक हे देशातील सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले आहेत. देशाच्या मुख्यमंत्र्यांची लोकप्रियता आणि मान्यता रेटिंग मोजण्यासाठी हे सर्वेक्षण तयार करण्यात आले होते. ‘मूड ऑफ द नेशन’ सर्वेक्षणानुसार नवीन पटनायक यांची लोकप्रियता ५२.७ टक्के होती. दुसऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे ५१.३ टक्के लोकप्रियता रेटिंगसह आहेत.

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांना ४८.६ टक्के रेटिंग मिळाले, तर चौथ्या क्रमांकावर गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल ४२.६ टक्के रेटिंगसह होते. त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी ४१.४ टक्के प्रशंसनीय लोकप्रियता रेटिंग मिळवून त्यांना पाचवे स्थान मिळविले.सर्वेक्षणाच्या निकालांनंतर त्रिपुरातील लोकांनी मुख्यमंत्री मनाईक साहा यांचे समर्पण, साधेपणा आणि त्यांच्या नेतृत्वाखाली राज्याने केलेल्या विकासाबद्दल त्यांचे कौतुक केले. त्रिपुरातील एका स्थानिक दुकानदाराने मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले. ते म्हणाले, मुख्यमंत्री साहा अत्यंत प्रामाणिक आहेत आणि ते नेहमीच तळागाळात काम करतात. ते कोणत्याही प्रकारच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी नेहमी तत्पर असतात.

हेही वाचा..

अमित शहा गरजले…विरोधी पक्षांच्या नेत्यांचे काम आपल्या मुलांना मुख्यमंत्री बनवणे!

हाताला सूज आली, मग शरीर सुजले…’दंगल’फेम सुहानीच्या निधनाचे कारण आले समोर

कमलनाथ यांना काँग्रेसने नाकारले राज्यसभेचे तिकीट, म्हणून…

अमरावतीत टेम्पो ट्रॅव्हल अपघातात चार क्रिकेटपटूंचा मृत्यू!

काशीपूर येथील दीपक देबनाथ या दुकानमालकाने सीएम साहा यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या प्रगतीबद्दल आनंद व्यक्त केला. मुख्यमंत्री माणिक साहा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही खूप चांगल्या स्थितीत आहोत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्रिपुरातील प्रत्येक व्यक्ती हळूहळू विकसित होत आहे, असे दीपक देबनाथ म्हणाले. साहा यांनी मार्च २०२३ मध्ये सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. बिजू जनता दलाच्या सदस्यांपैकी एक असलेले नवीन पटनायक हे २२ वर्षांहून अधिक काळ ओडिशाचे मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत. योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशचे २२ वे मुख्यमंत्री आहेत. २०२२ च्या यूपी विधानसभा निवडणुकीत योगी आदित्यनाथ यांनी सलग दुसऱ्यांदा विजय मिळवून इतिहास घडवला.

 

Exit mobile version