उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी ज्ञानवापी परिसराला भेट दिली. मुख्यमंत्री योगींनी ज्ञानवापीच्या व्यासजी तळघरात पोहचून तेथील मूर्तीचे दर्शन घेतले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसी दौरा असणार आहे.या दौऱ्यासाठी सुरु असलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री योगी वाराणसीला पोहोचले होते. यादरम्यान मुख्यमंत्री योगींनी काशी विश्वनाथ मंदिराला भेट दिली. दर्शनानंतर, मुख्यमंत्री योगी थेट ज्ञानवापीच्या व्यासजी तळघरात पोहोचले, जिथे त्यांनी मूर्तींची पहिली झलक पाहिली.
काशी विश्वनाथ मंदिराचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वभूषण मिश्रा यांनी सांगितले की, मुख्यमंत्री योगी मंगळवारी रात्री ८ वाजता काशी विश्वनाथला पोहोचले होते. सर्वप्रथम त्यांनी बाबा काशी विश्वनाथाची पूजा केली. येथून ते थेट व्यासजींच्या तळघरात गेले. यानंतर तळघरासमोरील नंदीजींचे दर्शनही घेतले.
हे ही वाचा:
सर्व पिकांना किमान आधारभूत किंमतीची कायदेशीर हमी दिल्यास आर्थिक आपत्ती
खलिस्तानी दहशतवादी पन्नूच्या निकटवर्तीयाच्या घरावर गोळीबार
भारत आणि यूएईदरम्यान वीज, डिजी पेमेंटसह आठ करार!
‘चर्चेला तयार, परंतु नवीन मुद्दे आणणे थांबवा’
विश्वभूषण मिश्रा यांनी पुढे सांगितले की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे काशी विश्वनाथ मंदिर परिसरात रात्री ८ ते ८:३० पर्यंत सुमारे अर्धा तास होते. काशी विश्वनाथ, व्यासजी तहखाना आणि नंदीजी या तिन्ही ठिकाणांना भेट दिल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ परत गेले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी २४-२५ फेब्रुवारी दरम्यान वाराणसीला जाण्याची शक्यता आहे.पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री योगी वाराणसीत दाखल झाले होते.त्यावेळी त्यांनी डॉ.संपूर्णानंद स्पोर्ट्स स्टेडियम आणि काशी रोपवेची पाहणी केली.तसेच अमूल प्लांटचीही पाहणी केली आणि विकास प्रकल्पांचाही त्यांनी आढावा घेतला.