वर्षभरात अयोध्येत ३१ कोटी पर्यटक, प्राणप्रतिष्ठेनंतर महापूर!

अयोध्या बनणार जगातील सर्वात भव्य पर्यटन स्थळ, मुख्यमंत्री योगी

वर्षभरात अयोध्येत ३१ कोटी पर्यटक, प्राणप्रतिष्ठेनंतर महापूर!

अयोध्या हे जगातील सर्वात भव्य पर्यटन स्थळ बनणार असल्याचा दावा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे.मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, गेल्या एका वर्षात ३१.५ कोटी पर्यटक उत्तर प्रदेशात आले आहेत. त्यामुळे राज्यात विविध प्रकारचे रोजगार निर्माण झाले आहेत. २२ जानेवारी रोजी श्री राम लल्लाच्या अभिषेकानंतर अयोध्या हे जगाच्या पर्यटन नकाशावर सर्वात विकसित आणि भव्य पर्यटन स्थळ असणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, डबल इंजिन सरकार राज्यातील धार्मिक पर्यटन स्थळांचा विकास करत आहे. यापूर्वी काशीविश्वनाथमध्ये पन्नास भाविक एकत्र उभे राहू शकत नव्हते. कॉरिडॉरच्या निर्मितीमुळे आता पन्नास हजार भाविकांना धाममध्ये एकत्र जमून धार्मिक कार्यक्रमात सहभागी होता येणार असल्याचे मुख्यमंत्री योगी म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्मार्ट फोन आणि टॅबलेटचे वाटप
मुख्यमंत्री योगी यांनी शुक्रवारी ‘राष्ट्रीय युवा दिना’निमित्त म्हणजे स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम टेक्निकल युनिव्हर्सिटीच्या अटलबिहारी वाजपेयी सभागृहात कार्यक्रम आयोजित केला होता.त्यावेळी ते बोलत होते. यादरम्यान, त्यांनी राज्यस्तरीय विवेकानंद युवा पुरस्कार आणि उत्तर प्रदेश स्टार्टअप धोरणांतर्गत स्टार्टअप्स/इनक्यूबेटर्सना प्रोत्साहनपर रक्कम आणि स्वामी विवेकानंद युवा सशक्तीकरण योजनेंतर्गत स्मार्ट फोन/टॅबलेटचे वाटप केले. मुख्यमंत्री योगी यांनी ‘माय भारत’ पोर्टलद्वारे स्वच्छता अभियानाशी संबंधित उपक्रमही सुरू केले. याशिवाय १४ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या विशेष स्वच्छता मोहिमेत युवक आणि राज्यातील सर्व नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

हे ही वाचा:

जय श्रीराम: रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी बोलावणार हुतात्मा कारसेवकांच्या कुटुंबियांना

स्वामी विवेकानंद जयंती अर्थात राष्ट्रीय युवा दिवस…विचारांचा जागर

कर्नाटक: वसतिगृहातील नववीच्या विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म!

पश्चिम बंगालचे नाव बदला…ममता बॅनर्जी यांची मागणी!

स्वामी विवेकानंदांनी भारतासह संपूर्ण जगाला एक नवा मार्ग दाखवला
मुख्यमंत्री योगी म्हणाले की, वयाच्या अवघ्या ३९ व्या वर्षी स्वामी विवेकानंदांनी भारतासह संपूर्ण जगाला एक नवा मार्ग दाखवला. उठा, जागे व्हा आणि ध्येय गाठेपर्यंत थांबू नका असा संदेश त्यांनी तरुणांना दिला. स्वामी विवेकानंदांचे हे विधान तरुणांनी नेहमी लक्षात ठेवावे. कारण प्रत्येक मार्गाला एक गंतव्यस्थान असते, जेव्हा आपण आपले योग्य गंतव्य आणि मार्ग निवडून पुढे जाऊ, तेव्हा आपल्याला यश नक्कीच मिळते.

 

भारताला जगातील मोठी ताकद बनण्यापासून कोणीही रोखू शकत नाही
मुख्यमंत्री योगी म्हणाले की,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत भारताला विकसित भारत बनवण्याचे वचन दिले आहे तशी प्रतिज्ञा घेतली आहे.गुलामीच्या मानसिकतेतून मुक्तता, विकसित भारत, वारशाचा अभिमान, नागरी कर्तव्य आणि एकता ह्या अशा पंचप्राण प्रतिज्ञा आहेत.आपण या संकल्पांसह आपले काम पूर्ण प्रामाणिकपणे केले तर भारताला जगातील एक मोठी शक्ती बनण्यापासून कोणीही रोखू शकणार नसल्याचे मुख्यमंत्री योगी म्हणाले.

 

Exit mobile version