‘राहुल गांधींचा प्रवास फुटिरतावादी नेता बनण्याच्या दिशेने’

योगी आदित्यनाथ यांची घणाघाती टीका

‘राहुल गांधींचा प्रवास फुटिरतावादी नेता बनण्याच्या दिशेने’

खासदार राहुल गांधींनी अमेरिका दौऱ्यादरम्यान फुटीरतावादी वक्तव्य केल्याबद्दल तीव्र टीका होत असताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही राहुल गांधी यांच्यावर प्रहार केला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, काँग्रेसचे युवराज राहुल गांधी भारतविरोधी फुटीरतावादी नेता बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत.

मुख्यमंत्री योगी पुढे म्हणाले की, देशात विभाजनाची बीजे पेरण्याचा राहुल गांधींचा प्रयत्न निंदनीय आहे आणि त्यांनी यासाठी देशवासीयांची माफी मागितली पाहिजे. विशेष म्हणजे भारतीय लोकशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी आक्षेप व्यक्त करण्याबरोबरच ‘शीख समुदाय त्यांच्या धर्माचा दावा करण्यास स्वतंत्र नाही’ यासह अनेक वादग्रस्त वक्तव्ये करून राहुल गांधी यांचा समावेश असलेला अलीकडील वाद उफाळून आला.

हेही वाचा..

प्रशिक्षणार्थी सैनिकाला बांधून मैत्रिणीवर बलात्कार?

जम्मू- काश्मीर: कुपवाडातील जंगलामधून लष्कराला सापडला मोठा शस्त्रसाठा

चंदीगडमध्ये माजी पोलिसांच्या घरी ग्रेनेड स्फोट, १ अटक, २ संशयित फरार !

कर्नाटक: गणपती मिरवणुकीवर दगडफेक प्रकरणी ५२ जणांच्या आवळल्या मुसक्या

परदेशी भूमीतून भारताविरुद्ध टीकास्त्र सोडल्याबद्दल राहुल गांधींवर निशाणा साधत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्यावर देशात विभाजनाची बीजे पेरल्याचा आरोप केला. एक्सवर योगी यांनी लिहिले आहे की, काँग्रेसचे युवराज राहुल गांधी भारतविरोधी फुटीरतावादी गटाचे नेते बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. भारताची एकता, अखंडता आणि सामाजिक सौहार्द नष्ट करणे आणि देशाला गृहयुद्धाकडे ढकलणे हेच त्यांचे एकमेव उद्दिष्ट आहे.

या पोस्टमध्ये पुढे असे लिहिले आहे की, राहुल गांधींनी हे समजून घेतले पाहिजे की जोपर्यंत या देशात भाजपचा एकही कार्यकर्ता आहे तोपर्यंत त्यांचे फूट पाडणारे हेतू सफल होणार नाहीत. आम्ही भारताचे लोक काँग्रेससह सर्व देशविरोधी शक्तींविरुद्ध एकजूट आहोत. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली NDA सरकार शोषित आणि वंचितांच्या उन्नतीसाठी कटिबद्ध आहे. देशात विभाजनाची बीजे पेरण्याचा प्रयत्न केल्याबद्दल राहुल गांधी यांनी देशवासीयांची माफी मागावी, असे त्यांनी त्यात म्हटले आहे.

 

Exit mobile version