भाजपा महिला मोर्चातर्फे ‘आंतरराष्ट्रीय योग दिनी गेट वे ऑफ इंडिया’ येथे बुधवारी सकाळी ९.०९ मिनिटांनी ९० महिलांनी नऊवारी नेसून अभिनव पद्धतीने योगासने सादर केली. भारताचा समृद्ध ठेवा योगसाधनेचे महत्व पटवून देण्यासाठी महाराष्ट्राचा पारंपरिक पेहराव नऊवारी नेसून याप्रसंगी ‘९ पॉवर योगासने’ सादर केली, अशी माहिती भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष व या कार्यक्रमाच्या प्रदेश संयोजक ‘चित्रा वाघ’ यांनी दिली. यावेळी भाजपा सोशल मीडिया प्रदेश प्रभारी श्वेता शालिनी व महिला मोर्चाच्या प्रदेश पदाधिकारी उपस्थित होत्या. योग प्रशिक्षक संजय पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.
आंतरराष्ट्रीय योग दिवस हा दरवर्षी २१ जून रोजी जगभरात साजरा केला जातो. शरीर, मन, समाज आणि अगदी आपल्या संपूर्ण आरोग्यासाठी योगाचे विशेष महत्त्व आहे.याच पार्श्वभूमीवर जगभरात योग दिन साजरा केला जातो. जगभरात योग साधनेचे महत्त्व अधोरेखित व्हावे यासाठी योग दिन साजरा व्हावा, असा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील सरकारच्या कार्यकाळातचं संयुक्त राष्ट्रांकडे पाठविला होता. संयुक्त राष्ट्रांनी याला मान्यता देत २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला. या अनुषंगाने भाजपा महिला मोर्चेतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन आज गेट ऑफ इंडिया येथे साजरा करण्यात आला. यावेळी महिलांनी नऊवारी साडी नेसत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.या कार्यक्रमात महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला असे चित्रा वाघ यांनी सांगितले.
हे ही वाचा:
इलॉन मस्क म्हणतात, ‘मी मोदींचा चाहता’
केवळ पैशासाठी मित्राच्या आईला मारणाऱ्यांना जन्मठेप
नंदन निलेकणींकडून आयआयटी मुंबईला ३१५ कोटींची देणगी
मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचारावरून ‘बोंबाबोंब’
श्रीमती वाघ म्हणाल्या की, धकाधकीच्या जीवनात निरोगी व तणावमुक्त रहाण्यासाठी योगसाधना गरजेची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी भारताचा समृद्ध ठेवा असलेल्या योगसाधनेला जगभरात पोहोचवले आणि त्यांच्या संकल्पनेतून जगभर आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. मोदी सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त राबवल्या जाणा-या उपक्रमाअंतर्गत यंदा २१ जून रोजी योगदिनानिमित्त सर्व विधानसभा व लोकसभा मतदारसंघांमध्ये या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचेही श्रीमती चित्रा वाघ यांनी सांगितले. योग रील स्पर्धा यासह विविध कार्यक्रमांमध्ये राज्यभरातील भाजपा लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.