केंद्र सरकारने अनेक बाबींचा विचार करून ‘योग’ला खेळ म्हणून मान्यता दिली आहे. त्यामुळे या खेळाचा समावेश स्त्री आणि पुरूष दोन्ही गटांसाठी खेलो इंडिया युथ गेम्स, २०२१ मध्ये करण्यात आला आहे.
त्याबरोबरच मोदी सरकारने नॅशनल योगासन स्पोर्ट्स फेडरेशनला (एनवायएसएफ) या खेळासाठी राष्ट्रीय खेळ संस्था (नॅशनल स्पोर्ट्स फेडरेशन) म्हणून मान्यता दिली आहे. त्यामुळे योगला देशात खेळ म्हणून विकसित होण्यास नक्कीच मदत होणार आहे.
ही माहिती केंद्रीय युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालयाचे राज्यमंत्री किरेन रिजिजु (स्वतंत्र प्रभार) यांनी लोकसभेत बोलताना दिली होती.
हे ही वाचा:
भंडारा ते भांडुप…होरपळणारी जनता आणि निर्ढावलेले सरकार
पुरावे नष्ट करण्यासाठी कोणी आदेश दिले?- आशिष शेलार
फोन टॅपिंगचा रिपोर्ट जितेंद्र आव्हाड, नवाब मलिकांनीच तयार केला
सरकारने एनवायएसएफला कोण्तायही प्रकारचे आर्थिक सहाय्य घेण्यासाठी पात्र केले आहे. त्या बरोबरच योगच्या देखील राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धा घेतल्या जाऊ शकतील. या स्पर्धादेखील सिनिअर, ज्युनिअर आणि सब-ज्युनिअर अशा विविध गटात घेतल्या जाऊ शकतील.
केंद्र सरकारने परवानगी दिल्यामुळे या खेळाची प्रमुख संस्था म्हणून एनवायएसएफवर वार्षिक चॅम्पियनशिप स्पर्धा भरवणे बंधनकारक राहणार आहे. त्याबरोबरच आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध योगासन स्पर्धांमध्ये भारतीय चमू देखील भारताचे प्रतिनिधीत्व करू शकेल याची काळजी घेण्याची जबाबदारी देखील या संस्थेवर आली आहे.