24 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषशांघायच्या ग्लोबल परिषदेत यशवंतराव चव्हाण केंद्र भारताचे प्रतिनिधित्व करणार!

शांघायच्या ग्लोबल परिषदेत यशवंतराव चव्हाण केंद्र भारताचे प्रतिनिधित्व करणार!

 मुंबई-शांघाय सिस्टर सिटी रिलेशनशिपचा १० वा वर्धापन दिन साजरा होणार

Google News Follow

Related

मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्र (वायसीसी) ही राज्याच्या सर्वांगीण विकासाला वाहिलेली महाराष्ट्रातील प्रमुख संस्था आहे. त्यामुळे चीनच्या शांघाय येथे आयोजित केलेल्या आगामी “जागतिक शहर दिन २०२४ ” ग्लोबल परिषदेत यशवंतराव चव्हाण केंद्राला सहभागी होण्यासाठी मुंबईतील पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाच्या कॉन्सुलेटने आमंत्रित केले आहे.

३० ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत शांघाय येथे होणाऱ्या “उत्तम जीवन शैलीसाठी लोक-केंद्रित शहरे तयार करणे” आणि शाश्वत शहरीकरणावर ज्ञानाची देवाणघेवाण, धोरण संवाद आणि सहयोग यासाठी आंतरराष्ट्रीय व्यासपीठ म्हणून काम करेल, अशी या परिषदेची थीम आहे.

युनायटेड नेशन्स ह्युमन सेटलमेंट्स प्रोग्राम (UN-Habitat) आणि चीनच्या गृहनिर्माण आणि शहरी-ग्रामीण विकास मंत्रालयाने संयुक्तपणे आयोजित केलेला हा कार्यक्रम मुंबई-शांघाय सिस्टर सिटी संबंधाच्या १० व्या वर्धापन दिनानिमित्त एक महत्त्वाचा टप्पा आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात १९ सप्टेंबर २०१४ रोजी नवी दिल्लीत झालेल्या चर्चेनंतर मुंबई आणि शांघाय यांच्यातील सिस्टर-सिटी संबंध प्रस्थापित झाले.

युनायटेड नेशन्सने ऐतिहासिक घटना म्हणून ओळखली जाणारी ही परिषद शाश्वतता, सर्वसमावेशकता आणि लोक-केंद्रित उपायांवर भर देऊन शहरी विकासातील आव्हाने आणि संधींचा स्वीकार करण्याच्या जागतिक बांधिलकीला अधोरेखित करते.

यशवंतराव चव्हाण केंद्राच्या अध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी या कार्यक्रमाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. “आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर यशवंतराव चव्हाण केंद्राचे प्रतिनिधित्व करण्याची ही संधी लोककेंद्रित शहरी उपक्रमांबद्दलची आमची बांधिलकी दर्शवते. यासाठी मी मुंबईतील चिनी कॉन्सुलेटचे मनापासून आभार मानते,” असे सुळे यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा : 

पंतप्रधान मोदींकडून ५१ हजार नोकऱ्यांची दिवाळी भेट

घटस्फोटांचा निर्णय न्यायालयच देणार, शरीयत परिषद नव्हे!

भाजपाची चौथी यादी जाहीर, आतापर्यंत १४८ जागांवर दिले उमेदवार!

केरळमध्ये मंदिरातील उत्सवादरम्यान फटाक्यांचा भीषण स्फोट, १५० हून अधिक जखमी

दरम्यान, शांघाय येथे आयोजित केलेल्या या प्रतिष्ठित परिषदेत भारताचे प्रतिनिधीत्व म्हणून, यशवंतराव चव्हाण सेंटरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दिप्ती नाखले यांच्या नेतृत्वाखाली आठ सदस्यीय शिष्टमंडळ पाठविण्यात येत असून या शिष्टमंडळात विविध क्षेत्रातील मान्यवर आणि व्यावसायिकांचा समावेश आहे.

सुप्रसिद्ध नगररचनाकार आणि पर्यावरणतज्ज्ञ गौतम कीर्तने; लेखक, जेष्ठ पत्रकार आणि शिक्षणतज्ज्ञ श्रीराम पवार; Project Mumbai संस्थेचे संस्थापक शिशिर जोशी; बारामती येथील एआयसी-एडीटीचे कृषी संशोधक डॉ. विवेक भोईटे; जेष्ठ नगर रचनाकार ॲलन अब्राहम; नवभारत माध्यम समूहाचे जेष्ठ पत्रकार प्रशांत बारसिंग; आणि साप्ताहिक विवेकचे कार्यकारी संपादक निमेश वहाळकर यांचा शिष्टमंडळात समावेश आहे.

शिष्टमंडळातील बहुविद्याशाखीय तज्ञ मंडळी जागतिक परिषदेत सहभागी होण्यासाठी येणाऱ्या शहरी नियोजक, धोरणकर्ते आणि विचारवंत नेते यांच्याशी सहकार्याचे मार्ग शोधतील आणि शाश्वत शहरी पद्धतींवरील अंतर्दृष्टीची देवाणघेवाण करतील. शांघाय नंतर हे शिष्टमंडळ चीनच्या झेजियांग प्रांतातील हांगझोऊ आणि काही ग्रामीण भागांनाही भेट देणार आहे.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा