मराठीतील नामवंत कवी यशवंत मनोहर यांना विदर्भ साहित्य संघाचा जीवनव्रती पुरस्कार जाहिर करण्यात आला होता. मात्र या संस्थेच्या पुरस्कार स्थळी सरस्वतीची प्रतिमा स्थापन केलेली असल्याने मनोहर यांनी हा पुरस्कार नाकारला आहे. त्यामुळे साहित्य वर्तुळातून नाराजीचा सूर उमटत आहे.
न्युज डंकाने याबाबत ज्येष्ठ साहित्यीक, जयराज साळगांवकर यांच्याशी बातचीत केली त्या बातचीतीचा हा सारांश
“हा पुरस्कार पंधरा वर्षापेक्षा अधिक काळ दिला जात आहे. या काळात सरस्वतीची प्रतिमा ठेवली जातेच, ही या संस्थेची परंपरा आहे; ती मोडीत काढण्याचा अधिकार यशवंत मनोहरांना नाही. जिथे जिथे लेखन, साहित्य, नाटक असते तिथे तिथे सरस्वती पुजली जातेच. आपल्या नाटकांच्या प्रारंभी रंगदेवता- शारदा स्तवन करण्याची परंपरा आहे. या प्राचीन भारतीय हिंदू परंपरा आहेत. त्याच्यामुळे कोणाला काही त्रासही होत नाही. फायदाही होत नाही, परंतु ती एक भावना आहे- प्रतिकात्मक आहे. सरस्वती हे बुद्धीचं प्रतिक आहे. सरस्वतीचे भक्त ते सारस्वत असं म्हटलं जातं. तो ही शब्द तुम्ही बदलणार का? हा पोरखेळ मनोहर सारख्या प्रगल्भ कवीने कशासाठी करावा? त्याला काय निवडणूक लढवायची आहे, की राजकारणात जायच आहे का? का ऍण्टी बिजेपी लॉबीकडून त्यांनी काही सहानुभूती हवी आहे का? यामागे त्याचा नेमका हेतू काय आहे? याची शंका घ्यायला जागा आहे. एखाद्या ठिकाणी काय हवं, ते ठरवण्याचा अधिकार यजमानाचा असतो. त्यांनी तिथे पारितोषिक विजेते पाहूणे या भूमिकेतून आपलं मत व्यक्त करावं. या कृतीतून त्यांना सवंग प्रसिद्धी पलिकडे काही मिळणार नाही. गेली कित्येक वर्ष चालू असलेला हा पुरस्कार मान्यता प्राप्त आहे, त्याला पत आहे तर एखादा मान्यवर तिथे येऊन असं काही करत असेल, तर त्याला काही अर्थ नाही. असं काहीतरी करून उगाच गालबोट का लावलं जातं, हे मला कळलं नाही. मुळात सरस्वती ही बुद्धीची देवता आहे. सरस्वतीची देवळे क्वचितच दिसतात, अर्थात त्याच्यामागे वेगळी कथा आहे, त्याच्यामध्ये जायला नको.”
विदर्भ साहित्य संघातर्फे ग.त्र्यं. माडखोलकर यांच्या स्मृती निमित्त दिला जाणारा ‘जीवनव्रती’ हा द्वैवार्षिक पुरस्कार आहे. यापुर्वी हा पुरस्कार कविवर्य ग्रेस, नाटककार महेश एलकुंचवार, कविवर्य म.म. देशपांडे, कविश्रेष्ठ सुरेश भट, पक्षितज्ज्ञ मारूती चित्तमपल्ली, वक्ता दशसहस्त्रेषु प्रा. राम शेवळकर, प्रा. वसंत आबाजी डहाके, कथा कादंबरीकार आशा बगे यांसारख्या मान्यवारांना प्राप्त झाला आहे.
नाव मिळालं की भाव वाढतो भाव खाता खाता चाव सुचतो अन् आपल्याच हातानं मुळावरच घाव घालतो त्यातलीच ही गत. माझं तर स्पष्ट मत
त्यांची ढासळणार पत ..
दासमनु
मोदी शासनाच्या दृढ निश्चयापुढे जिथे दस्तुरखुद्द महाराष्ट्र शासनाचे सर्वेसर्वा,मार्गदर्शक हताश आहेत तिथे पुरस्कार वापसी करणाऱ्या बांडगुलांची काय कथा! जनतेच्या प्रेमाची जर त्यांना कदर नसेल तर आपणही त्यांची पर्वा का करावी?असले पुरस्कार महानुभावांच्या जीवनसरस्व असलेल्या निर्मितीचा गौरव म्हणून दिला जातो ह्याची जाण असलेले विद्वान ते कृतज्ञतेने शिरोधार्य समजतात.ज्यांना ते शासकीय कृपाप्रसादाने मिळाल्याची सल वाटते ते नाकारतात असा अनुभव आहे.तेव्हा कविश्रेष्ठ मनोहर यांनी आपल्या कार्याचा मागोवा घेऊन उचित कृति करावी ही नम्र विनंती!💐