सिने कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा भार उचलणार यशराज फिल्म

सिने कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा भार उचलणार यशराज फिल्म

मल्टी नॅशनल कंपन्या भारतात स्थापन करण्याची वेळ- पंतप्रधान नरेंद्र मोदी कोविड-१९ च्या २ लशी भारतीय कंपन्यांनी बनवल्यावरचे विधान.

करोनावरील लसीकरणासाठी आर्थिक मदतीचे अनेक हात पुढे येत आहेत. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजच्या ३० हजार कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाची जबाबदारी सुप्रसिद्ध यशराज फिल्म्सने उचलली आहे.फेडरेशनला पत्र लिहून यशराज फिल्म्सने आपला इरादा व्यक्त केला आहे. फेडरेशनच्या या कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी आपल्याला लस खरेदी करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणीही यशराज फिल्म्सने केली आहे.

हे ही वाचा:

पवारांना पुन्हा पंतप्रधान पदाचे वेध

बंगाल हिंसाचार: पंतप्रधान मोदींची राज्यपालांशी चर्चा

कोविडयोद्धे पोलिस बांधवांनो तुमच्यासाठी काय पण..

ठाणेकरांसाठी भाजपातर्फे प्लाझ्मा हेल्पलाईन

सिने फेडरेशनमध्ये सुमारे अडीच लाख नोंदणीकृत कर्मचारी आहेत. यशराज फिल्म्सचे उपाध्यक्ष अक्षय विधानी यांनी म्हटले आहे की, १ मे रोजी पत्र लिहून आम्ही द यश चोप्रा फाऊंडेशनच्या माध्यमातून लसीकरणासाठी आर्थिक हातभार लावण्याची तयारी दर्शविली होती.

पत्रात असे म्हटले होते की, सिनेजगत सध्या एका संकटाचा सामना करत आहे. सिनेजगताचे अर्थचक्र पुन्हा सुरू करण्याची गरज आहे. त्यातून हे सगळे कर्मचारी पुन्हा एकदा उत्पन्न मिळवू लागतील. त्यासाठी द यश चोप्रा फाऊंडेशन या कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा सारा खर्च उचलणार आहे. त्यांच्यात लसीकरणाबाबत जागृती निर्माण करणे, लसीकरणासाठी त्यांची ने-आण करणे ही कामेही फाऊंडेशन करणार आहे.

सिने फेडरेशनचे अध्यक्ष बी. तिवारी यांनी सांगितले की, सिने फेडरेशन यश चोप्रा फाऊंडेशनचे आभारी आहेत. त्यांनी सिने कर्मचाऱ्यांचा प्राधान्याने विचार केला. फेडरेशनने राज्य सरकारला हे सिने कर्मचारी, तंत्रज्ञ, कलाकार यांच्यासाठीही लस उपलब्ध करण्याची मागणी केली आहे.

Exit mobile version