25 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरविशेषजयस्वाल पुन्हा ‘यशस्वी’, सलग दुसरे द्विशतक

जयस्वाल पुन्हा ‘यशस्वी’, सलग दुसरे द्विशतक

विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी

Google News Follow

Related

भारताचा सलामीवीर यशस्वी जयस्वालने रविवारी इतिहास रचला. पाठदुखीमुळे शतक पूर्ण केल्यावर अर्धवट खेळ थांबलेला असताना जयस्वाल रविवारी पुन्हा मैदानात उतरला. त्याने सलग दुसऱ्या कसोटीत द्विशतक झळकावण्याचा पराक्रम केला. राजकोट येथे सुरू असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत यशस्वी जयस्वालने सामन्याच्या चौथ्या दिवशी ही द्विशतकी खेळी केली. २३१ चेंडूंत १४ चौकार आणि १० षटकारांसह त्याने हे द्विशतक पूर्ण केले. त्यानंतर भारताने आपला दुसरा डाव ४ बाद ४३० धावांवर घोषित केला. त्यामुळे इंग्लंडपुढे ५४८ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले.

 

सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पाठदुखीमुळे त्याला अर्धवट आपला खेळ थांबवावा लागला होता. तेव्हा त्याने आपले शतक पूर्ण केले होते. पण रविवारी तो पुन्हा एकदा पॅड बांधून सामन्यासाठी सज्ज झाला. शुभमन गिल ९१ धावांवर बाद झाल्यानंतर जयस्वालने पुन्हा एकदा मैदानात पाऊल ठेवले. खेळपट्टी प्रतिकूल ठरण्याची शक्यता नव्हती शिवाय, इंग्लंडचे फिरकी आणि वेगवान गोलंदाज आपल्य़ापरीने प्रयत्न करत होते. पण जयस्वालने कोणताही धोका पत्करला नाही. स्थिरस्थावर झाल्यानंतर त्याने आपल्या धावांचा वेग वाढविला. रेहान अहमदच्या दोन षटकात त्याने दोन षटकार लगावले. जो रूटच्या गोलंदाजीवरही त्याने षटकार लगावला. उपाहाराला त्याने १४९ धावांपर्यंत मजल मारली.

हे ही वाचा:

शिवकालीन दांडपट्ट्याला ‘राज्यशस्त्र’ म्हणून मिळणार दर्जा!

कमलनाथ यांच्यानंतर मनीष तिवारीही भाजपच्या संपर्कात?

गीतकार गुलजार आणि जगद् गुरू रामभद्राचार्य यांना ज्ञानपीठ पुरस्कार!

बारामतीत रंगणार पैठणीचा खेळ

उपाहारानंतर अँडरसनच्या षटकात त्याने चक्क तीन षटकार लागोपाठ लगावले. या वेगामुळे त्याने लगेचच द्विशतक पूर्ण केले. सलग दोन कसोटीत द्विशतक झळकावणारा यशस्वी जयस्वाल हा भारताचा दुसरा फलंदाज ठरला. याआधी, विराट कोहलीने ही कामगिरी केलेली आहे. श्रीलंकेत २०१७मध्ये विराटने ही कामगिरी केली होती. विनू मंकड यांनी एकाच मालिकेत (न्यूझीलंड) दोन द्विशतके ठोकली आहेत. पण ती लागोपाठच्या कसोटीत नव्हती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा