23.4 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरविशेष‘या चित्रपटामुळे कोणी नाराज झाल्याचे मला तरी दिसलेले नाही’

‘या चित्रपटामुळे कोणी नाराज झाल्याचे मला तरी दिसलेले नाही’

आर्टिकल ३७० चित्रपटावर आखादी देशांत बंदीवर अभिनेत्री यामी गौतम हिची प्रतिक्रिया

Google News Follow

Related

अभिनेत्री यामी गौतम अभिनित ‘आर्टिकल ३७०’ हा चित्रपट भारतभर २३ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला. मात्र या चित्रपटाला आखादी देशांकडून अद्याप प्रमाणपत्र मिळालेले नाही. असे असले तरी हा चित्रपट देशभरात प्रेक्षकांना आकर्षून घेण्यात यशस्वी ठरला आहे. या यशाबद्दल बोलताना आणि आखाती देशांतील बंदीबाबत यामी गौतमी हिने प्रतिक्रया दिली आहे. ‘या चित्रपटामुळे कोणी नाराज झाल्याचे मला तरी दिसलेले नाही. हा केवळ दृष्टिकोनाचा फरक आहे,’ असे तिने स्पष्ट केले.

आखाती देशांत या चित्रपटाला अजूनही हिरवा कंदील मिळाला नसल्याबाबत तिला प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा ‘असे का केले गेले, हे आम्हाला खरेच माहीत नाही. चित्रपटात काहीही आक्षेपार्ह नाही. भारतात या चित्रपटाला ज्या प्रकारे चांगला प्रतिसाद मिळतो आहे, त्यावरून मला तरी कोणीही नाराज झालेले दिसत नाही. किंबहुना हा प्रोपगंडा चित्रपट नाही, असेही अनेकजण म्हणत आहेत. तरीही असे काही जण असतील जे न पाहताच निर्णय देतील आणि आम्हाला त्याची सवय झाली आहे. मात्र ते स्वतःला म्हणत आहेत की, तुम्ही चित्रपटातून बाहेर पडा, देशाप्रति अभिमान बाळगा.

हे ही वाचा:

नितीन गडकरी यांची मल्लिकार्जुन खर्गे, जयराम रमेश यंना कायदेशीर नोटीस!

भारताला भेट देण्यासाठी आलेल्या स्पॅनिश महिलेवर सामूहिक बलात्कार!

गौतम गंभीरचा राजकारणाला राम राम!

बेंगळुरूतील कॅफेमध्ये स्फोट; आयईडी स्फोटके पेरणारा सीसीटीव्हीमध्ये कैद

यामुळेच काश्मीरसारख्या राज्यात अतिशय महत्त्वाची शांतता प्रस्थापित झाली आणि विकास झाला,’ असे यामी गौतमी हिने सांगितले.‘ही दृष्टीकोनाची बाब आहे – कोणाला हा उन्मत्त राष्ट्रवाद वाटू शकतो. परंतु माझ्यासाठी ही देशभक्ती आहे,’ असेही ती म्हणाली. थिएटरमध्ये चित्रपट पाहणे हा अलीकडच्या काळातील सर्वोत्तम अनुभवांपैकी एक होता, असेही तिने सांगितले. आम्ही सर्वजण टाळ्या वाजवत होतो. एकमेकांच्या शेजारी बसलेले अनोळखी लोक एकतेची भावना निर्माण करू शकतात. तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल चांगले वाटते, तर माझ्या मते, ही एक चांगली बाब आहे.

मला मोठी कथा, सकारात्मक कथा बघायला आवडते आणि त्यासोबत घरी जायला आवडते,’ असे त्या म्हणाल्या. ‘आर्टिकल ३७०’ हा चित्रपट जिओ स्टुडिओ आणि आदित्य धर यांच्या बी ६२ स्टुडिओने निर्मित केला आहे. यात यामीने एक गुप्तचर अधिकारी झूनी हक्सरची भूमिका साकारली आहे. जम्मू आणि काश्मीरमधून ३७० कलम रद्द करण्याच्या मुद्द्यावर हा चित्रपट साकारण्यात आला आहे. या चित्रपटात प्रियमणी, अरुण गोविल आणि किरण करमरकर यांच्याही मुख्य भूमिका आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा